Silver Rate Today Saam TV
बिझनेस

Silver Rate Today : चांदीचा भाव १ लाखांच्या पुढे; गगनाला भिडलेले तुमच्या शहरातील दर वाचले का?

Ruchika Jadhav

सणासुदीच्या काळात प्रत्येक व्यक्ती घरात थोडं का होईना सोनं खरेदी करतात. महागाईचा भडका उडालेला असताना आता सोन्याच्या भावानेही जोरदार उसळी घेतली आहे. सोने-चांदीचा भाव दररोज बदलत आहे. अशात आज प्रति किलो चांदीचा आणि १ तोळा सोन्याचा भाव काय आहे? तसेच विविध शहरांत यांच्या किंमती किती? याबाबत माहिती जाणून घेणार आहोत.

आज सकाळी जाहीर झालेल्या दरांनुसार, १०० ग्रॅम सोन्याचा भाव आज ७,९७,९०० रुपये इतका आहे. तर १० ग्रॅम सोन्याचा भाव ७९,७९० रुपये आहे. ८ ग्रॅम सोन्याचा भाव ६३,८३२ रुपये आहे. तसेच १ ग्रॅम सोन्याचा भाव ७,९७९ रुपये इतका आहे.

१८ कॅरेट सोन्याचा भाव किती?

१८ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याचा भाव ५,९८,५०० रुपये आहे.

१० ग्रॅम सोन्याचा भाव ५९,८५० रुपये आहे.

८ ग्रॅम सोन्याचा भाव ४७,८८० रुपये आहे.

१ ग्रॅम सोन्याचा भाव ५,९८५ रुपये इतका आहे.

२२ कॅरेट सोन्याचा भाव काय?

२२ कॅरेट १ ग्रॅम सोनं आज ७,३१५ रुपयांना विकलं जात आहे.

८ ग्रॅम सोनं ५८,५२० रुपयांवर आहे.

१० ग्रॅम सोनं आज ७३,१५० रुपये इतकं आहे.

१०० ग्रॅम सोनं ७, ३१, ५०० रुपयांवर पोहचलं आहे.

विविध शहरांतील १ ग्रॅम सोन्याच्या किंमती

मुंबईमध्ये आज २२ कॅरेट सोन्याचा भाव ७,३०० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा भाव ७,९६४ रुपये आहे.

पुण्यात २२ कॅरेट सोन्याचा भाव ७,३०० रुपये आहे. तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ७,९६४ रुपये इतका आहे.

जळगाव २२ कॅरेट सोन्याचा भाव ७,३०० रुपये आहे. तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ७,९६४ रुपये इतका आहे.

नाशिक आणि नागपूरमध्ये देखील २२ कॅरेट सोन्याचा भाव ७,३०० रुपये आहे. तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ७,९६४ रुपये इतका आहे.

चांदीचा भाव काय?

चांदीच्या किंमतीने आज मोठी उसळी घेतली आहे. चांदीचा भाव थेट १ लाखाच्या पुढे पोहचला आहे. एक किलो चांदीचा आजचा भाव १,०२,००० इतका आहे. तर मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर सारख्या विविध शहरांत आज चांदी याच किंमतीने विकली जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Murbad Politics : CM शिंदेंचे खंदे समर्थक शरद पवारांच्या राष्ट्रवादीत; सुभाष पवार वडिलांच्या पराभवाचा वचपा काढणार?

BJP Candidate List : भाजपची दुसरी यादी कधी जाहीर होणार? माहिती आली समोर | Marathi News

Maharashtra News Live Updates: महायुतीतील जागावाटपाचा घोळ अद्याप सुरूच

चिमणीचं वजन किती असतं, तुम्हाला माहितीये का?

Abhishek Bachchan-Aishwarya Rai: अभिषेकने ऐश्वर्याला केलेल्या प्रपोजचा किस्सा, खोटी अंगठी देत प्रेमाची कबुली

SCROLL FOR NEXT