पौष महिना संपला की, लग्नसराईचा काळ पुन्हा सुरु होतो. अशावेळी सोनं-चांदी खरेदी करण्याकडे ग्राहकांचा अधिक जास्त कल असतो. जानेवारी महिन्यात सोन्याच्या भावात घसरण झालेली पाहायला मिळाली आहे.
परंतु, मिळालेल्या माहितीनुसार अर्थमंत्रालयाने सोन्या-चांदीच्या आयाती शुल्कावर १५ टक्क्यांनी वाढ केली आहे. त्यामुळे सोने (Gold) -चांदी खरेदी करताना अधिकचे पैसे (Price) मोजावे लागतील.
देशातंर्गत सोन्याच्या दरात वाढ होणार आहे. अमेरिकन बाजारात सोन्याचे भाव अस्थिर झालेले पाहायला मिळाले आहे. यूएस मध्यवर्ती बँकर्सच्या लवकर दर कपातीमुळे डॉलर आणि ट्रेझरी उत्पन्न अधिक मजबूत झाल्यामुळे आज सोन्याचा भाव या ठिकाणी जास्त आहे. परंतु, आज सोन्याच्या दरात घसरण झालेली पाहायला मिळाली तर चांदीच्या दरात वाढ झाली आहे. जाणून घेऊया मुंबई-पुण्यातील आजचे दर
आज गुड रिटर्न्सच्या वेबसाइटनुसार सकाळच्या सत्रात २२ कॅरेटनुसार १ ग्रॅम सोन्यासाठी ५,७८५ रुपये मोजावे लागणार आहे. २२ कॅरेटनुसार सोन्याच्या भावात ५०० रुपयांनी (Price) घसरण झाली आहे. तसेच २४ कॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ६३,१०० रुपये मोजावे लागतील. २४ कॅरेटसाठी ४०० रुपयांनी घसरण झालेली पाहायला मिळाली.
आज प्रतिकिलो चांदीसाठी (Silver) ७६,००० रुपये मोजावे लागतील. आज चांदीच्या किमतीत प्रति किलोत ७०० रुपयांनी वाढ झाली आहे. (Gold Silver Price Today In Marathi)
1. २४ कॅरेटनुसार प्रमुख शहरातील आजचा भाव किती? (Gold Rate Today)
मुंबई- ६२,९५० रुपये
पुणे - ६२,९५० रुपये
नागपूर - ६२,९५० रुपये
नाशिक - ६२,९८० रुपये
ठाणे - ६२,९५० रुपये
अमरावती - ६२,९५० रुपये
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.