Gold Silver Price Hike Saam TV
बिझनेस

Gold Silver Price Hike : सोन्याचा भाव वाढला, चांदीच्या किंमती घसरल्या; वाचा मुंबई-पुण्यातील दर

Gold Silver Rate Today (12 June 2024) : सोने-चांदीच्या दरात सातत्याने चढ-उतार होताना दिसत आहे. पत्नीसाठी दागिने बनवायचे असतील आणि बजेट कमी असेल तर आज तुम्ही चांदीचा एखादा दागिना पत्नीला देऊ शकता.

Ruchika Jadhav

वटपौर्णिमेचा सण जवळ येत आहे. अशात वटपौर्णिमेनिमित्त प्रत्येक व्याक्ती आपल्या पत्नीला काही ना काही गिफ्ट देण्याचा विचार करतो. काही जण पत्नीसाठी दागिने देखील खरेदी करतात. आता तुम्हाला देखील पत्नीसाठी दागिने बनवायचे असतील आणि बजेट कमी असेल तर आज तुम्ही चांदीचा एखादा दागिना पत्नीला देऊ शकता. सोने-चांदीच्या दरात सातत्याने चढ-उतार होताना दिसत आहे. अशात आजच्या किंमती काय आहेत ते पाहू.

आज सोन्याच्या किंमती वाढल्यात तर चांदीचे दर कोसळले आहेत. चांदीच्या किंमती काल वाढल्या होत्या आणि काल सोनं स्वस्त झालं होतं. मात्र आत उलट बाजार फिरला आहे. आज चांदी प्रति किलो १०० रुपयांनी कमी झाली आहे. त्यानुसार आज विविध शहरांमध्ये सोने-चांदीच्या किंमती काय आहेत ते जाणून घेऊ.

सोन्याच्या वाढलेला भाव

बुधवारी १०० ग्राम सोन्याची किंमत १०० रुपयांनी कमी झाली असून ६,६०,१०० रुपये इतका भाव आहे. १० ग्राम सोनं म्हणजेच एक तोळा सोन्याचा भाव देखील १० रुपयांनी कमी झाला असून ६६,०१० रुपयांनी सोनं विकलं जात आहे. ८ ग्राम सोन्याचा भाव ५२,८०८ रुपये तर एक ग्राम सोन्याचा भाव ६,६०१ रुपये इतका आहे.

२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?

२४ कॅरेट १०० ग्राम सोन्याचा भाव ७,२०,००० रुपये आहे.

१० ग्राम सोन्याचा भाव ७२.००० रुपये आहे.

८ ग्राम सोन्याचा भाव ५७.६०० रुपये आहे.

तर १ ग्राम सोन्याचा भाव ७,२०० रुपये इतका आहे.

मुंबई आणि पुण्यातील भाव

मुंबईत २२ कॅरेट सोनं ६,६५८६ रुपये, २४ कॅरेट सोनं ७,१८५ रुपये आणि १८ कॅरेट ५,३८९ रुपये प्रति ग्रामचा भाव आहे.

पुण्यात २२ कॅरेट सोनं ६,६५८६ रुपये, २४ कॅरेट सोनं ७,१८५ रुपये आणि १८ कॅरेट ५,३८९ रुपये प्रति ग्रामचा भाव आहे.

चांदीचा भाव

चांदीचा भाव १०० रुपये प्रति किलोमागे घसरला आहे. त्यामुळे १ किलो चांदीचा भाव ९०,४०० रुपये आहे. तर १०० ग्राम चांदीचा भाव ९,०४० रुपये, १० ग्राम चांदी ९०४ रुपये असा अजचा भाव आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jui Gadkari: चांद तू नभातला...

Maharashtra Live News Update: ३१ जानेवारीपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या – सर्वोच्च न्यायालय

Operation Sindoor: भारतीय हवाई हल्ल्यात दहशतवादी मसूद अजहरचं अख्ख कुटुंब खल्लास, Video viral

मोदींच्या मनात पाप असलं तरी.., मी त्यांना दुश्मन मानत नाही; उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?

Banjara Community : अमरावती जिल्ह्यातील सकल बंजारा समाज आक्रमक; एसटी आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

SCROLL FOR NEXT