Gold Silver Rate (5th January 2024) Saam Tv
बिझनेस

Gold Silver Rate (5th January 2024): सोन्याच्या भावात घसरण, चांदीही नरमली; जाणून घ्या आजचा भाव

कोमल दामुद्रे

Gold Silver Rate In Maharashtra (5th January 2024 ):

जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सोन्या-चांदीच्या भावात चढ-उतार पाहायला मिळाला आहे. परंतु, शुक्रवारी सकाळी मिळालेल्या माहितीनुसार सोन्याच्या भावात घसरण झालेली पाहायला मिळाली. डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सोन्याच्या भावात ७०० रुपयांनी वाढ झाली होती.

फेडरल रिझर्व्हच्या नव्या धोरणामुळे यूएस शेअर बाजार आणि जागतिक पातळीवर सोन्या-चांदीच्या दरावर दिसून येत आहे. देशातंर्गत होणारा शेअर बाजारातील चढउतार आणि भू-राजकीय परिस्थितीमुळे सोन्याच्या (Gold) किमतीवर परिणाम झाला आहे.

सोन्याच्या वाढत्या दरामुळे त्याचा खरेदीदारांवर परिणाम होताना दिसून येत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने प्रति औंस $2,058 च्या जवळपास आहे. जाणून घेऊया मुंबई (Mumbai) -पुण्याचा आजचा भाव

आज गुड रिटर्न्सच्या वेबसाइटनुसार आज सकाळच्या सत्रानुसार २२ कॅरेटनुसार १ ग्रॅम सोन्यासाठी ५,८१५ रुपये मोजावे लागणार आहे. तसेच २४ कॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ६३,४०० रुपये मोजावे लागतील. आज सोन्याच्या भावात १३० रुपयांनी वाढ झाली आहे. तसेच चांदीच्या किमतीही (Price)घसरल्या आहेत. आज प्रतिकिलो चांदीसाठी (Silver) ७६,६६० रुपये मोजावे लागतील. (Gold Silver Price Today In Marathi)

1. २४ कॅरेटनुसार प्रमुख शहरातील आजचा भाव किती? (Gold Rate Today)

  • मुंबई- ६३,२७० रुपये

  • पुणे - ६३,२७० रुपये

  • नागपूर - ६३,२७० रुपये

  • नाशिक - ६३,३०० रुपये

  • ठाणे - ६३,२७० रुपये

  • अमरावती - ६३,२७० रुपये

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: मविआची 80 टक्के जागावाटपावर चर्चा पूर्ण, विदर्भात तिढा कायम; VIDEO

Maharashtra News Live Updates : पुण्यात उद्या नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस आणि सुप्रिया सुळे एकाच मंचावर येणार

Mumbai Senate Election : मोठी बातमी! मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थागित, कारण काय? पाहा व्हिडिओ

Mumbai Crime : किरकोळ वाद टोकाला गेला; दोन कुटुंबात लोखंडी रॉड आणि बांबूने तुफान हाणामारी, VIDEO

Fact Check: 99 रुपयांत मिळणार दारू? सरकारने आणलं नवं मद्य धोरण? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? वाचा...

SCROLL FOR NEXT