Gold Silver Rate (4th January 2024) Saam Tv
बिझनेस

Gold Silver Rate (4th January 2024): सोन्याच्या भावात घसरण सुरु, चांदीची चकाकी उतरली; मुंबई-पुण्यातील आजचा भाव किती?

कोमल दामुद्रे

Gold Silver Rate In Maharashtra (4th January 2024 ):

नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात सोन्या-चांदीच्या भावात चढ-उतार पाहायाला मिळाली आहे. आज सोन्याच्या भावात घसरण झालेली पाहायला मिळाली आहे. डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सोन्याच्या भावात ७०० रुपयांनी वाढ झाली होती.

नवीन वर्षाच्या पहिल्या दोन दिवशी सोन्याचा भाव हा वाढला होता. परंतु, आज सोन्याचे भावात घसरण झालेली पाहायला मिळाली आहे. तर चांदीच्या किमतीतही घसरण झाली आहे.

फेडरल रिझर्व्हच्या नव्या धोरणामुळे यूएस शेअर बाजार आणि जागतिक पातळीवर सोन्या-चांदीच्या दरावर दिसून येत आहे. देशातंर्गत होणारा शेअर बाजारातील चढउतार आणि भू-राजकीय परिस्थितीमुळे सोन्याच्या (Gold) किमतीवर परिणाम झाला आहे.

आज गुड रिटर्न्सच्या वेबसाइटनुसार आज सकाळच्या सत्रानुसार २२ कॅरेटनुसार १ ग्रॅम सोन्यासाठी ५,८२५ रुपये मोजावे लागणार आहे. तसेच २४ कॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ६३,५३० रुपये मोजावे लागतील. आज सोन्याच्या भावात ४४० रुपयांनी घसरण झाली आहे. तसेच चांदीच्या किमतीही (Price)घसरल्या आहेत. आज प्रतिकिलो चांदीसाठी (Silver) ७६,६०० रुपये मोजावे लागतील. आज चांदीच्या दरात २०० रुपयांनी घसरण झालेली पाहायला मिळाली आहे.(Gold Silver Price Today In Marathi)

1. २४ कॅरेटनुसार प्रमुख शहरातील आजचा भाव किती? (Gold Rate Today)

  • मुंबई- ६३,३८० रुपये

  • पुणे - ६३,३८० रुपये

  • नागपूर - ६३,३८० रुपये

  • नाशिक - ६३,४१० रुपये

  • ठाणे - ६३,३८० रुपये

  • अमरावती - ६३,३८० रुपये

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur News: धर्मराज काडादी यांनी विधानसभा लढवण्याची केली घोषणा, सोलापूरमधून उमेदवारीसाठी शिंदेंना घातलं साकडं?

Ratnagiri Killing Case : स्वप्न पडलं, डेड बॉडीचं गूढ उलगडलं? रत्नागिरीतील हत्याकांडाचा सस्पेन्स उलगडणार? पाहा व्हिडिओ

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

SCROLL FOR NEXT