Gold Silver Rate (17th January 2024) Saam tv
बिझनेस

Gold Silver Rate (17th January 2024): सोन्याचा भाव ३८० रुपयांनी घसरला, चांदीची चकाकी नरमली; जाणून घ्या मुंबई-पुण्यातील आजचा भाव

Today's (17th January 2024) Gold Silver Rate In Maharashtra: मागच्या सलग ३ ते ४ दिवसांपासून सोन्याचा भाव हा सतत घसरत आहे. मागील वर्षात सोन्याच्या भावाने उच्चांकाची पातळी ओलांडली होती. मकर संक्रांतीनंतर लग्नसराईचा मुहूर्त नसतो त्यामुळे खरेदीदारांचा अधिक कल हा दागिन्यांकडे असतो.

कोमल दामुद्रे

Gold Silver Rate In Maharashtra (17th January 2024 ):

मकर संक्रांतीनंतर लग्नसराईचा मुहूर्त नसतो त्यामुळे खरेदीदारांचा अधिक कल हा दागिन्यांकडे असतो. पौष महिन्यात शुभ कार्य करणे वर्ज्य मानले जाते. त्यामुळे सोन्याच्या दरात घसरण झालेली पाहायला मिळते.

मागच्या सलग ३ ते ४ दिवसांपासून सोन्याचा भाव हा सतत घसरत आहे. मागील वर्षात सोन्याच्या भावाने उच्चांकाची पातळी ओलांडली होती. आज सोन्याच्या किमतीत जागतिक पातळीवर वाढ होताना दिसत आहे.

काही दिवसांपासून कॉमेक्सवर सोन्याची (Gold) जागतिक फ्युचर्स किंमत (Price) 0.30 टक्के किंवा $6.10 च्या वाढीसह $2057.70 प्रति औंसवर व्यवहार करताना दिसून आली. तर सोन्याच्या जागतिक स्पॉट किमतीतही वाढ झाली आहे. प्रति औंस $ 2054.11 वर व्यापार करत आहे. जाणून घेऊया आजचे दर

आज गुड रिटर्न्सच्या वेबसाइटनुसार सकाळच्या सत्रात २२ कॅरेटनुसार १ ग्रॅम सोन्यासाठी ५,७८५ रुपये मोजावे लागणार आहे. २२ कॅरेटनुसार सोन्याच्या भावात ३५० रुपयांनी घसरण झाली आहे. तसेच २४ कॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ६३,१०० रुपये मोजावे लागतील. २४ कॅरेटसाठी ३८० रुपये जास्तीचे मोजावे लागतील.

आज प्रतिकिलो चांदीसाठी (Silver) ७५,९०० रुपये मोजावे लागतील. आज चांदीच्या किमतीत प्रति किलोत ५०० रुपयांनी घसरण झाली आहे. (Gold Silver Price Today In Marathi)

1. २४ कॅरेटनुसार प्रमुख शहरातील आजचा भाव किती? (Gold Rate Today)

  • मुंबई- ६२,९५० रुपये

  • पुणे - ६२,९५० रुपये

  • नागपूर - ६२,९५० रुपये

  • नाशिक - ६२,९८० रुपये

  • ठाणे - ६२,९५० रुपये

  • अमरावती - ६२,९५० रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सरकारी रुग्णालयात मोठा घोटाळा! बोगस दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणात बड्या वैद्यकीय अधिकाऱ्याला अटक, मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश

Maharashtra News Live Update: झारखंडमधील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा - अभिजीत दिपके

Konkan To Akkalkot : स्वामी भक्तांसाठी आनंदाची बातमी! कोकणातून अक्कलकोटसाठी थेट बससेवा सुरु; कुठून धावणार? तिकीट दर काय?

Heart Attack - High BP : हार्ट अटॅक अन् हाय बीपीचा धोका कमी करण्यासाठी 'या' बिया ठरतील वरदान

इन्शुरन्स नसेल तर पेट्रोल-डिझेलही मिळणार नाही? सुप्रीम कोर्टाच्या 'या' नव्या नियमाने देशभरात खळबळ

SCROLL FOR NEXT