Gold Silver Price Today (6th November) Saam Tv
बिझनेस

Gold Silver Price Today (6th November): सोन्याचा भाव घसरला, चांदीची चकाकीही नरमली; वाचा आजचे दर

Today's (6th November 2023) Gold Silver Rate In Maharashtra : आज सकाळच्या सत्रात सोन्याच्या भावात घसरण झालेली पाहायला मिळाली आहे.

कोमल दामुद्रे

Gold Silver Rate In Maharashtra (6th November 2023):

ऐन सणासुदीच्या काळात सोनं महागल्याने ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागणार आहे. दिवाळीच्या काळात सोनं खरेदीला अधिक मागणी असते. या काळात अनेकजण सोन्याच्या दागिन्यात गुंतवणूक करतात.

नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला सोन्याचे भाव १२०० रुपयांनी स्वस्त झाले होते. तर दसऱ्यात सोन्याने ६२ हजारांचा टप्पा ओलांडला होता. ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सोन्याचा भाव ६२,७७० रुपये इतका होता. परंतु, इस्त्राइल-हमास युद्धामुळे सोन्याच्या भावात आणखी वाढ होणार का असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आज सोन्याचे भाव शनिवार इतकेच आहेत. सकाळच्या सत्रानुसार भाव अद्यापह कोणताही बदल झालेला नाही. तर चांदीच्या दरात किंचित वाढ झाली आहे. गुड रिटर्न्सच्या वेबसाइटसनुसार आज २२ कॅरेटनुसार १ ग्रॅम सोन्यासाठी ५,६५० रुपये मोजावे लागणार आहेत तर २४ कॅरेटनुसार १ तोळ्यासाठी ६१,७९० रुपये मोजावे लागणार आहे. तर चांदीच्या (Silver) किमतीत वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. आज १ किलो चांदीसाठी ७५२०० रुपये (Price) मोजावे लागणार आहेत.

मुंबई (Mumbai) -पुण्यात गुड रिटर्न्सच्या वेबसाइटसनुसार आज २४ कॅरेटसाठी ६१,४७० रुपये मोजावे लागणार आहे तर नागपूर-ठाण्यातही भाव सारखाच आहे. अशातच नाशिकमध्ये सोन्याचे भाव किंचित घसरले आहे. आज नाशकात २४ कॅरेटसाठी ६१,५०० रुपये मोजावे लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope: वाणीवर लक्ष द्या, पैशाचं टेन्शन कमी होईल; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Maharashtra News Live Update: ईदच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या वतीने रूट मार्च

Arvind Kejriwal : आमचं सरकार आलं तर ५ दिवसांत E20 पेट्रोलवर बंदी; केजरीवाल यांची मोठी घोषणा

CJP New Team: कॉक्रोच जनता पार्टीमध्ये मोठा फेरबदल, नवीन सदस्यांची नियुक्ती, कुणाला मिळाली संधी?

Mysterious Fort : रहस्यांनी भरलेला प्राचीन किल्ला, 'या' गोष्टी तुम्हाला आश्चर्यचकित करतील

SCROLL FOR NEXT