Today's Gold Silver Rate, (27th April 2024) Gold Silver Price In Maharashtra Saam Tv
बिझनेस

Today's Gold Silver Rate : सोन्याच्या भावात वाढ, चांदीची चकाकी उतरली; जाणून घ्या नवे दर

(27th April 2024) Gold Silver Price In Maharashtra: एप्रिल महिन्याच्या शेवटी पुन्हा एकदा सोन्याच्या भावात चढ-उतार झालेली पाहायला मिळाली आहे. या आठवड्यात सोन्याच्या दरात सुरुवातीला घसरण झाली होती तर चांदीचे दर स्थिर होते.

कोमल दामुद्रे

24K Gold and Silver Price in Maharashtra:

एप्रिल महिन्याच्या शेवटी पुन्हा एकदा सोन्याच्या भावात चढ-उतार झालेली पाहायला मिळाली आहे. या आठवड्यात सोन्याच्या दरात सुरुवातीला घसरण झाली होती तर चांदीचे दर स्थिर होते.

आठवड्याच्या शेवटी पुन्हा एकदा सोन्याने भाव खाल्ला आहे. तर चांदीच्या किंमती घसरल्या आहेत. काल सकाळच्या सत्रात सोन्या-चांदीच्या भावात वाढ झाली होती. मार्च-एप्रिल महिन्यात सोन्याने सर्वकालीन उच्चांक भाव नोंदवला होता.

चांदीच्या दराने १० दिवसांतील नरमाईला ब्रेक दिला. काल चांदी २ हजारांनी वधारली तर सोन्याने पण मुसंडी मारली आहे. सोन्याच्या भावात आज पुन्हा २२० रुपायांनी वाढली आहे. जाणून घेऊया महाराष्ट्रासह मुंबई-पुण्यातील आजचे नवे दर

गुड रिटर्न्सच्या वेबसाइटनुसार आज सकाळच्या सत्रात २२ कॅरेटनुसार १ ग्रॅम सोन्यासाठी ६,७०० रुपये तर २४ कॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ७३,०८० रुपये (Price) मोजावे लागणार आहे. आज सोन्याच्या (Gold) भावात २२० रुपयांनी वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. तसेच आज प्रतिकिलो चांदीसाठी (Silver) ८४,००० रुपये मोजावे लागतील. तर चांदीच्या भावात ५०० रुपयांनी घसरण झाली आहे.

२४ कॅरेटनुसार प्रमुख शहरातील आजचा भाव किती? (24k Gold Rate Today)

  • मुंबई (Gold Rate in Mumbai) - ७२,९३० रुपये

  • पुणे (Gold Price in Pune) - ७२,९३० रुपये

  • नागपूर (Gold Rate in Nagpur) - ७२,९३० रुपये

  • नाशिक(Gold Price in Nashik) - ७२,९६० रुपये

  • ठाणे (Gold Rate in Thane) - ७२,९३० रुपये

  • अमरावती (Gold Price in Amravati) - ७२,९३० रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

65 वर्षे जुना कायदा बदलण्याच्या तयारीत मोदी सरकार, खासदार अपात्रता कायद्याच्या जागी नवीन कायदा आणण्याची केंद्राची योजना

Maharashtra News Live Updates: पुणे शहरासह जिल्ह्यात आज अनेक नेत्यांच्या सभा

Shani Margi 2024: शनी देव कुंभ राशीत मार्गस्थ; 'या' राशींसमोर संकटं येणार, आर्थिक घडी विस्कटणार

Ayushman Bharat Yojana: ५ लाखांपर्यंत मोफत उपचार, कोणत्या हॉस्पिटलमध्ये घेता येणार उपचार; पाहा लिस्ट

Sharad Pawar vs Ajit Pawar : साहेब की दादा, बारामतीमध्ये आज कुणाचा आव्वाज घुमणार?

SCROLL FOR NEXT