Gold Silver Price Today (16th October) Saam Tv
बिझनेस

Gold Silver Price Today (16th October): नवरात्रीत सोन्याचा भाव गडगडला, चांदीही घसरली; जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

Today's (16th October 2023) Gold Silver Rate In Maharashtra : शनिवारी सोन्याचा दर हा ६० हजारांवर येऊन पोहोचला होता. आज सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळाली.

कोमल दामुद्रे

Gold Silver Rate In Maharashtra (16th October):

सणासुदीचे दिवस सुरु झाले असून सोन्याचा भाव घसरला आहे. त्यामुळे आज सराफ बाजारात खरेदीदारांची मंदियाळी पाहायला मिळेल. मागच्या आठवड्याभरापासून सोन्याच्या किमतीत चांगलीच वाढ पाहायला मिळाली. इस्राइल हमास युद्धाचा परिणाम सोन्यावर दिसून आला.

मागच्या काही काळात सोन्याच्या किमतीत काही दिवसांपूर्वी ५ हजारांनी घसरण पाहायला मिळाली. अशातच शनिवारी सोन्याचा दर हा ६० हजारांवर येऊन पोहोचला होता. परंतु, आज सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. महाराष्ट्रात सोन्याचा भाव किती यावर नजर टाकूया.

मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याची (Gold) किमत ५९००० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. तर चांदीचा भाव हा ७१००० च्या जवळपास आहे. आज MCX नुसार सोन्याचा भाव 0.35 टक्क्यांनी घसरुन ५९१९८ रुपये प्रति तोळा असणार आहे. याशिवाय चांदीचा (Silver) भाव हा 71,135 रुपये प्रति किलो झाला आहे.

1. तुमच्या शहरातील सोन्याचे आज दर

गुड रिटर्न्सच्या वेबसाइट्नुसार आज मुंबई (Mumbai)-पुण्यात २४ कॅरेटसाठी ६०,११० रुपये मोजावे लागणार आहे. तर नाशिकमध्ये ६०,१४० रुपये प्रति तोळ्यासाठी मोजावे लागतील. नागपूरमध्ये देखील प्रति तोळ्याला ६०,११० आज मोजावे लागतील.

2. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव किती?

अमेरिकेत सोन्याच्या भावाने महिन्याभरापूर्वी विक्रमी पातळी गाठली होती. इस्त्राइल आणि हमास युद्धामुळे दरात चढ-उतार पाहायला मिळेल. अशातच सोन्याची किंमत 0.5 टक्क्यांनी घसरून $1,921.69 प्रति तोळा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan News : कल्याणमध्ये पोलिसांकडून २ वर्षांच्या मुलीवर गंभीर गुन्हा, काय आहे संपूर्ण प्रकरण? Video

Chandrashekhar Bawankule : फोन टॅपिंगनंतर आता मोबाईल सर्व्हिलन्स? बावनकुळेंच्या वक्तव्याने राज्यात खळबळ, VIDEO

Saturday Horoscope : विनाकारण कामांमध्ये येणाऱ्या अडचणीमुळे मनोबल कमी होईल; ५ राशींच्या लोकांना राहावे लागेल सावध

Maharashtra Government : राज्यात बांगलादेशी घुसखोरांना आळा बसणार; फडणवीस सरकारने उचललं मोठं पाऊल

Satara News : डॉक्टर महिलेचे आरोपीसोबत १५० हून अधिक कॉल, आत्महत्येपूर्वी काय घडलं? पोलीस तपासात महत्वाची माहिती समोर

SCROLL FOR NEXT