Gold Silver Price Today (11th November) Saam Tv
बिझनेस

Gold Silver Price Today (11th November): खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी! लक्ष्मी पूजनाच्या आदल्या दिवशी सोन्याचा भाव दणकून आपटला, जाणून घ्या आजचा दर

Today's (11th November 2023) Gold Silver Rate In Maharashtra : गेल्या काही दिवसांच्या तुलनेत सोन्याच्या भावात पतझड झालेली पाहायला मिळाली.

कोमल दामुद्रे

Gold Silver Rate In Maharashtra (11th November 2023):

धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर सोनं-चांदीला अधिक मागणी असते. धनत्रयोदशीसह लक्ष्मीपूजनाला देखील सोनं खरेदीला विशेष मान आहे. या काळात दागिन्यांमध्ये गुंतवणूक केली जाते.

धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर सोन्याच्या दरात वाढ झालेली पाहायला मिळाली. तरी देखील ग्राहकांनी सोने-चांदीची जोरदार खरेदी केली. अशातच उद्या असणाऱ्या लक्ष्मी पूजनाच्या शुभ मुहूर्ताआधी सोन्याचे भाव गडगडले आहेत. गेल्या काही दिवसांच्या तुलनेत सोन्याच्या भावात पतझड झालेली पाहायला मिळाली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

युक्रेन-रशिया युद्धामुळे देश सावरत असताना अशातच गाझापट्टीतील युद्धाचा परिणाम भारतासह इतर अनेक देशांमध्ये दिसून आला. आंतरराष्ट्रीय बाजारात (Market) पेट्रोल-डिझेलसह सोन्या-चांदीच्या दरावर दिसून आला. आखाती युद्धाचा परिणाम सोन्या-चांदीवर दिसून येत आहे. अशातच आज सोन्याचे भाव घसरले आहेत. सोन्याच्या (Gold) भावात ४९० रुपयांनी घसरण झालेली पाहायला मिळाली.

गुड रिटर्न्सच्या वेबसाइटसनुसार आज २२ कॅरेटनुसार १ ग्रॅम सोन्यासाठी ५,५७० रुपये तर २४ कॅरेटनुसार १ तोळ्यासाठी ६०,७५० रुपये मोजावे लागणार आहे. तर चांदीच्या (Silver) किमतीतही घट झाली आहे. आज १ किलो चांदीसाठी ७३,००० रुपये (Price) मोजावे लागणार आहेत.

1. २४ कॅरेटनुसार प्रमुख शहरातील आजचे सोन्याचे दर किती?

  • मुंबई- ६०, ६०० रुपये

  • पुणे - ६०, ६०० रुपये

  • नागपूर - ६०, ६०० रुपये

  • नाशिक- ६०,६३० रुपये

  • ठाणे - ६०, ६०० रुपये

  • अमरावती - ६०, ६०० रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rohini Khadse: कोण आहे रोहिणी खडसे? जाणून घ्या त्यांच्याविषयी

Maharashtra Live News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांची इच्छा - नितेश राणे

7 minutes after death: मृत्यूनंतर 7 मिनिटांत काय घडतं? पाहा वैज्ञानिक दृष्टीकोनातून समोर आलेल्या धक्कादायक गोष्टी

GK: महिलांनी साष्टांग नमस्कार का टाळावा? काय आहे यामागचं शास्त्रीय कारण

Pune: रेव्ह पार्टीचा 1:42 मिनिटाचा INSIDE VIDEO समोर; २ तरूणी अन् मित्रांसोबत खडसेंचा जावई नशेन धुत

SCROLL FOR NEXT