Gold Silver Rate (30th November) Gold Silver Price Information in Marathi (30th November 2023) - Saam Tv
बिझनेस

Gold Silver Rate (30th November): लग्नसराईत खरेदीदारांना दिलासा! सोन्याचा भाव ६५० रुपयांनी घसरला, मुंबई-पुण्यात आजचे दर किती?

कोमल दामुद्रे

Gold Silver Rate In Maharashtra (30th November):

नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात लग्नसराईचा मुहूर्त अधिक प्रमाणात असतो. या काळात लग्नसराईच्या खरेदीसोबतच सोन्या-चांदीची खरेदी देखील अधिक प्रमाणात केली जाते.

सध्या लग्नसराईचा काळ सुरु झाला असून या दिवसांत सोन्या-चांदीला अधिक मागणी असते. मागच्या सहा महिन्यात सोन्याच्या किमतीत चढ-उतार पाहायला मिळाला. दिवाळीच्या काळात सोन्याचे भाव नमले होते परंतु, दिवाळीनंतर पुन्हा एकदा किमतीत तेजी पाहायला मिळाली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याच्या भावाने सहा महिन्यांतील उच्चांकी पाताळी काल गाठली. यामुळे देशांतर्गात बाजारपेठेतही सोन्याच्या (Gold) भावाने काल बुधवारी उसळी घेतली होती. काल मुंबईच्या सराफ बाजारात २४ कॅरेट सोन्याचा भाव ८२० रुपयांनी वाढून ६३ हजार ३८० रुपयांवर पोहोचला. चांदीच्या भावानेही प्रतिकिलोसाठी ७०० रुपयांनी वाढ नोंदवून ७९ हजार २०० रुपयांची पातळी गाठली होती. अशातच आज पुन्हा सोन्याचा भाव आज पुन्हा घसरला आहे.

आज सोन्याच्या भावात २४ कॅरेटनुसार ६५० रुपयांनी घसरला आहे. गुड रिटर्न्सच्या वेबसाइटसनुसार आज सकाळच्या सत्रात २२ कॅरेटनुसार १ ग्रॅम सोन्यासाठी ५,७६५ रुपये मोजावे लागणार आहे. तसेत २४ कॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ६२,८८० रुपये मोजावे लागतील. तसेच चांदीच्या किमतीत (Price) कोणताही बदल झालेला नाही. आज चांदीचे भाव स्थिर पाहायला मिळाले आहेत. आज प्रतिकिलो चांदीसाठी (Silver) ७९,२०० रुपये मोजावे लागतील. (Gold Silver Price Today In Marathi)

1. २४ कॅरेटनुसार प्रमुख शहरातील आजचा भाव किती? (Gold Rate)

  • मुंबई- ६२,७३० रुपये

  • पुणे - ६२,७३० रुपये

  • नागपूर - ६२,७३० रुपये

  • नाशिक - ६२,७६० रुपये

  • ठाणे - ६२,७३० रुपये

  • अमरावती - ६२,७३० रुपये

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT