Gold Silver Price Today (31st October) Saam Tv
बिझनेस

Gold Silver Price Today (31st October): महिन्याच्या शेवटच्या दिवशी दिलासा! सोन्याच्या भावात घसरण, मुंबई- ठाण्यात आजचा दर किती?

Today's (31st October 2023) Gold Silver Rate In Maharashtra : आज सोन्याच्या भावात ५५० रुपयांनी घसरण झालेली पाहायला मिळाली आहे.

कोमल दामुद्रे

Gold Silver Rate In Maharashtra (31st October):

ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. महिन्याभरात सोन्याच्या दरात ४००० रुपयांनी वाढ झाली होती. दसऱ्यापूर्वी सोन्याचा भाव वाढल्याने सराफ बाजारात शुकशुकाट पाहायला मिळाला.

सणासुदीच्या काळात सोनं अधिक प्रमाणात खरेदी केले जाते. मागच्या काही काळापासून तज्ज्ञांनी दिवाळीत सोन्याचा भाव आणखी वाढणार अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. आखाती देशातील युद्धाचा परिणाम सोन्या-चांदीत दिसून आला. अशातच आज सोन्याच्या भावात ५५० रुपयांनी घसरण झालेली पाहायला मिळाली आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या दरात झपाट्याने वाढ होत आहे. मागच्या आठवड्यात सोन्याने विक्रमी दराकडे वाटचाल केली होती. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमती प्रति तोळ्यानुसार $2,000 रुपये झाले होते.

गुड रिटर्न्सच्या वेबसाइटसनुसार आज २२ कॅरेटनुसार १ ग्रॅम सोन्यासाठी ५,६८५ रुपये मोजावे लागणार आहेत तर २४ कॅरेटनुसार १ तोळ्यासाठी ६२,००० रुपये मोजावे लागणार आहे. आज २४ कॅरेटनुसार सोन्याच्या भावात मागील दरानुसार ५५० रुपयांनी घट झालेली पाहायला मिळाली. तर चांदीच्या (Silver) किमतीही घसरल्या आहेत. आज १ किलो चांदीसाठी ७५,३०० रुपये (Price) मोजावे लागणार आहेत.

1. मुंबई- ठाण्यात सोन्याचा भाव किती?

गुड रिटर्न्सच्या वेबसाइटसनुसार मुंबई (Mumbai)-पुणे-नागपूर आणि ठाण्यात २४ कॅरेट सोन्यासाठी ६१,८५० रुपये मोजावे लागणार आहे. तर नाशिकमध्ये आज २४ कॅरेट सोन्यासाठी ६१,८८० रुपये मोजावे लागतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

National Pension Scheme: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सरकारच्या 'या' योजनेवर मिळणार नवीन सूट

Water Drinking Rules: पाणी पिण्याचे 'हे' 4 सोपे नियम पाळा, आणि आजारांपासून दूर राहा

Maharashtra Live News Update: मराठी भाषेसाठी एकत्र येण्याचं आवाहन, मनसेकडून विजयी मेळाव्याचे बॅनर

Chocolate Milkshake Recipe: स्नॅक्स टाइमसाठी १० मिनिटात बनवा यम्मी चॉकलेट मिल्कशेक

Devendra Fadnavis : संकुचित विचार मराठी माणसाला शोभत नाही; शिंदेंच्या जय गुजरात घोषणेवर फडणवीसांचं विरोधकांना प्रत्युत्तर

SCROLL FOR NEXT