Gold Price Today Saam Tv
बिझनेस

Gold Rate Today: सोन्याच्या दरात सर्वात मोठी घसरण, १ तोळ्यासाठी किती मोजावे लागणार? वाचा 18k- 22k आणि 24kचे दर

Gold - Silver Price Today: सोनं-चांदीच्या दरामध्ये आज मोठा बदल झाला. सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली. तर चांदीचे दर मात्र स्थिर आहेत. आज खरेदी करायला जाण्यापूर्वी वाचा आजचे दर किती?

Priya More
  • सोनं-चांदीच्या दरात आज मोठा बदल

  • २४ कॅरेटचे १ तोळा सोनं १८६० रुपयांनी स्वस्त

  • २२ आणि १८ कॅरेट सोन्याचे दरही घसरले

  • चांदीच्या दरात आज काहीच बदल झाला नाही

सोनं-चांदीच्या दरात गेल्या काही दिवसांपासून वाढ सुरू होती. या वाढीला अखेर ब्रेक लागला आहे. आज सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. तर चांदीच्या दरात काहीच बदल झाला नाही. त्यामुळे आज सोन्यासोबत चांदी देखील खरेदी करण्याची सुवर्णसंधी आहे. आज २४ कॅरेटचे १ तोळा सोनं १,८६० रुपयांनी स्वस्त झालं आहे. आज सोनं खरेदी करायला जाण्यापूर्वी तुम्ही १८- २२ आणि २४ कॅरेटचे दर किती आहेत ते जाणून घ्या...

गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, आज २४ कॅरेटच्या सोन्याच्या दरात आजही मोठी घसरण झाली आहे. २४ कॅरेटचे १ तोळा सोनं १,८६० रुपयांनी स्वस्त झालं आहे. हे सोनं खरेदीसाठी ग्राहकांना १,५४,८०० रुपये खर्च करावे लागतील. २४ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये १८,६०० रुपयांनी घसरण झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी आज ग्राहकांना १५,४८,००० रुपये खर्च करावे लागतील. जर तुम्हाला सोन्यामध्ये गुंतवणूक करायची असेल तुमच्यासाठी आज चांगली संधी आहे.

२२ कॅरेट सोन्याच्या दरात देखील आज मोठी घसरण झाली आहे. २२ कॅरेटचे १ तोळा सोनं १,७०० रुपयांनी स्वस्त झालं आहे. हे सोनं खरेदीसाठी ग्राहकांना १,४१,९०० रुपये खर्च करावे लागतील. २२ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये १७,००० रुपयांनी घसरण झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी आज ग्राहकांना १४,१९,००० रुपये खर्च करावे लागतील. सोन्याचे दागिने २२ कॅरेटचे तयार केले जातात. २२ कॅरेटच्या सोन्याचे दर घसरल्यामुळे आज तुम्ही सोन्याचे दागिने खरेदी करु शकता.

२४ आणि २२ कॅरेटपाठोपाठ १८ कॅरेट सोन्याच्या दरात देखील आज चांगलीच घसरण झाली आहे. १८ कॅरेटचे १ तोळा सोनं १३९० रुपयांनी स्वस्त झालं आहे. हे सोनं खरेदीसाठी ग्राहकांना १,१६,१०० रुपये खर्च करावे लागतील. २४ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये १३,९०० रुपयांची घसरण झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी आज ग्राहकांना ११,६१,००० रुपये खर्च करावे लागतील. दरम्यान, आज सोन्याच्या दरात जरी मोठी घसरण झाली असली तर चांदीचे दर मात्र स्थिर आहेत. आज १ ग्रॅम चांदी खरेदीसाठी ग्राहकांना २५० रुपये खर्च करावे लागतील. तर १ किलो चांदी खरेदीसाठी २,५०,००० रुपये मोजावे लागतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मावळात बेकायदेशीर उत्खनन; तहसील कार्यालयावर तृप्ती देसाईंचे बोंबाबोंब आंदोलन

माळशेज घाटात भीषण अपघात; ST बस आणि आयशर टेम्पोची समोरासमोर धडक; वाहतूक विस्कळीत

Weight Loss Tips: किती पावले चालण्याने आठवड्यात १ किलो वजन कमी होईल?

Gyanesh Kumar : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पद्मभूषण द्या; भाजप नेत्याची मागणी

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींसाठी खुशखबर, अवघ्या काही तासांत खात्यात पैसे जमा होणार, महत्त्वाची अपडेट आली समोर

SCROLL FOR NEXT