Gold- Silver Rates Rise Again  meta ai
बिझनेस

Gold Rate Today: आठवड्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठा बदल, वाढले की घसरले? वाचा १८- २२ आणि २४ कॅरेटचे दर

Gold-Silver Price Today: सोन्याच्या दरात आज मोठी वाढ झाली. तर चांदीचे दर मात्र स्थिर आहेत. आजचे दर किती आहेत ते घ्या जाणून...

Priya More

सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या दरात चढ-उतार सुरू आहे. आज सराफा बाजार उघडताच सोनं-चांदीच्या दरात मोठा बदल झाला आहे. आठवड्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली तर चांदी दर मात्र स्थिर आहेत. १ तोळा सोन्याचे दर २७० रुपयांनी वाढले. आज सोनं-चांदी खरेदी करण्यासाठी जाण्यापूर्वी आजचे ताजे दर किती आहेत ते वाचून जा...

गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, आज २४- २२ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली. २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये २७० रुपयांची वाढ झाली. हे सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहकांना १,३७,६२० रुपये खर्च करावे लागतील. तर २४ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये २,७०० रुपयांची वाढ झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज ग्राहकांना १३,७६,२०० रुपये खर्च करावे लागतील.

आज २२ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये २५० रुपयांची वाढ झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी ग्राहकांना १,२६,१५० रुपये खर्च करावे लागतील. २२ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरात २,५०० रुपयांची वाढ झाली. हे सोनं खरेदीसाठी आज ग्राहकांना १२,६१,५०० रुपये मोजावे लागतील.

२४ आणि २२ कॅरेटपाठोपाठ १८ कॅरेटचे सोनं देखील आज महाग झालं आहे. आज १८ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरात २१० रुपयांनी वाढ झाली. हे सोनं खरेदीसाठी ग्राहकांना १,०३,२२० रुपये खर्च करावे लागतील. १८ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये २,१०० रुपयांची वाढ झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज ग्राहकांना १०,३२,२०० रुपये खर्च करावे लागतील.

दरम्यान, आज सोन्याचे दर वाढले पण चांदीचे दर मात्र स्थिर आहेत. आज १ ग्रॅम चांदी १९५ रुपयांना विकली जात आहे. तर आज १ किलो चांदी १,९५,००० रुपयांना विकली जात आहे. आज तुम्हाला चांदी खरेदीची चांगली संधी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lion : जंगलाचा राजा सिंह 'या' ५ प्राण्यांना घाबरतो, समोर येताच घेतो माघार; कारण जाणून थक्क व्हाल

Maharashtra News Live Update: ई फेरफार पीक पाहणीला मुदतवाढ देण्याचा फडणवीस सरकारचा निर्णय

Kitchen Hacks : गॅस शेगडीचे नॉब्स तेलकट, काळे अन् चिकट झालंत? वापरा 'ही' सोपी ट्रिक; मिनिटांत शेगडी दिसेल नव्यासारखी

Best Tiles For Home: बाथरूमपासून ते किचनपर्यंत...! घरात कशा प्रकारचे टाईल्स लावणं योग्य? जाणून घ्या

Night Leg Pain : फक्त रात्रीच पाय का दुखतात? दुर्लक्ष करू नका, 'ही' असू शकतात ३ गंभीर कारणं

SCROLL FOR NEXT