Gold Price Today Saam Tv
बिझनेस

Gold Rate Today: सुवर्णसंधी! सोन्याच्या दरात मोठी घसरण, १० तोळा २९४०० रुपयांनी स्वस्त, तुमच्या शहरातील आजचे दर किती?

Gold-Silver Price Today: सोन्याच्या दरात आज मोठी घसरण झाली आहे. १० तोळा २९४०० रुपयांनी स्वस्त झालं आहे. आज सोनं खरेदी करायला जाण्यापूर्वी आजचे २४,२२ आणि १८ कॅरेटचे दर किती ते वाचा...

Priya More

Summary -

  • सोन्याच्या दरात मोठी घसरण

  • १० तोळा सोनं २९,४०० रुपयांनी स्वस्त

  • २४, २२ आणि १८ कॅरेटचं सोनं खरेदी करण्याची चांगली संधी

  • सोन्यापाठोपाठ चांदीचे दर देखील कमी झाले

सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. आज सराफा बाजार उघडताच सोनं-चांदीच्या दरात चांगलीच घसरण झाली आहे त्यामुळे ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आज सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी आहे. २४ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये २९,४०० रुपयांनी घसरण झाली आहे. तर १ किलो चांदीच्या दरात देखील १०० रुपयांची घसरण झाली. आज सोनं-चांदी खरेदी करायला जाण्यापूर्वी आजचे दर किती आहेत ते जाणून घ्या...

गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, आज २४ कॅरेट सोन्याच्या दरात चांगलीच घसरण झाली आहे. २४ कॅरेटचे १ तोळा सोनं २९४० रुपयांनी स्वस्त झालं आहे. हे सोनं खरेदीसाठी आज तुम्हाला १,४५,९७० रुपये खर्च करावे लागणार आहे. तर २४ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये २९,४०० रुपयांनी घसरण झाली आहे. हे सोनं आज १४,५९,७०० रुपये खर्च करावे लागणार आहे.

२२ कॅरेटच्या सोन्याच्या दरात देखील मोठी घसरण झाली आहे. २२ कॅरेटचे १ तोळा सोनं २,७५० रुपयांनी स्वस्त झालं आहे. हे सोनं खरेदीसाठी तुम्हाला १,३३,८०० रुपये खर्च करावे लागणार आहे. तर २२ कॅरेटचे १० तोळा सोनं २७,५०० रुपयांनी स्वस्त झालं आहे. हे सोनं खरेदीसाठी तुम्हाला १३,३८,००० रुपये खर्च करावे लागतील.

२४ आणि २२ कॅरेट सोन्यापाठोपाठ आज १८ कॅरेटच्या सोन्याच्या दरात देखील मोठी घसरण झाली. आज १८ कॅरेटचे १ तोळा सोनं २,२५० रुपयांनी स्वस्त झालं. हे सोनं खरेदीसाठी तुम्हाला १,०९,४८० रुपये खर्च करावे लागतील. तर १८ कॅरेटचे १० तोळा सोनं २२,५०० रुपयांनी स्वस्त झालं. हे सोनं खरेदीसाठी तुम्हाला १०,९४,८०० रुपये खर्च करावे लागतील. आज २४,२२ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दरात घसरण झाल्यामुळे खरेदीची चांगली संधी आहे.

तुमच्या शहरातील सोन्याचे दर किती?

मुंबई -

२४ कॅरेट - १४,५९७ रुपये

२२ कॅरेट - १३,३८० रुपये

१८ कॅरेट - १०,९४८ रुपये

पुणे -

२४ कॅरेट - १४,५९७ रुपये

२२ कॅरेट - १३,३८० रुपये

१८ कॅरेट - १०,९४८ रुपये

चेन्नई -

२४ कॅरेट - १५,२१९ रुपये

२२ कॅरेट - १३,९५१ रुपये

१८ कॅरेट - ११,६४१ रुपये

दिल्ली -

२४ कॅरेट - १४,६१२ रुपये

२२ कॅरेट - १३,३९५ रुपये

१८ कॅरेट - १०,९६३ रुपये

कोलकाता -

२४ कॅरेट - १४,५९७ रुपये

२२ कॅरेट - १३,३८० रुपये

१८ कॅरेट - १०,९४८ रुपये

अहमदाबाद -

२४ कॅरेट - १४,६०२ रुपये

२२ कॅरेट - १३,३८५ रुपये

१८ कॅरेट - १०,९५३ रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: काँग्रेसच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाच्या संभाजीनगर शहरात निदर्शने

Iran War : भारताच्या जहाजांवर होमुर्ज सामुद्रधुनीत हल्ला, इराणच्या सर्वोच्च नेत्याची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले 'युद्ध....'

Constipation Relief: 30 मिनिटांत पोट होईल साफ, फॉलो करा हे रुटीन

महत्त्वाची बातमी! टोल प्लाझावर आजपासून नवे नियम लागू; रोख रक्कम बंद, डिजिटल पेमेंट अनिवार्य

Tips To Get Glowing Skin: महागड्या फेशियलला करा Bye! हळदीचा खास फेसपॅक देईल नैसर्गिक गुलाबी चमक

SCROLL FOR NEXT