Gold Price may be hike Saam TV
बिझनेस

Gold Price: देशात सोनं टंचाई? आयात रखडली, किंमती वाढणार? व्यवहारांनाही मोठा ब्रेक

Gold Price: सोन्याच्या आयातीसाठी आवश्यक परवाने अत्यल्प प्रमाणात उपलब्ध असल्यानं सोन्या- चांदीची आयात रखडलीय त्यामुळे देशात सोन्याची मोठी टंचाई निर्माण होऊन सोन्याचे दर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोन्याचे दर कसे वाढणार? पाहूयात या रिपोर्टमधून.

Suprim Maskar

Gold Price: भारत आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) यांच्यातील व्यापार करारानुसार (CEPA) होणाऱ्या सोन्याच्या आयातीवर सध्या मोठे संकट ओढवले आहे. 2026-27 या आर्थिक वर्षासाठीचा नवीन टॅरिफ रेट कोटा अद्याप जाहीर न झाल्यामुळे देशभरात सोन्याच्या आयातीला मोठा ब्रेक लागलाय... आयात प्रक्रिया रखडल्यामुळे सराफा बाजारात खळबळ उडाली असून, भविष्यात सोने-चांदीच्या किंमती आणखी भडकण्याची दाट शक्यता वर्तवली जातेय...

सध्या सोन्याच्या आयातीसाठी आवश्यक परवाने अत्यल्प प्रमाणात उपलब्ध आहेत. परकीय व्यापार महासंचालनालयाकडे (DGFT) पाठपुरावा करूनही अंतिम निर्णय झालेला नाही. त्यामुळे सोने- चांदीच्या निर्यात प्रक्रियेत अडथळे निर्माण झाल्यानं मागणी असूनही व्यवहार पूर्ण करता येत नसल्याची नाराजी सराफांनी व्यक्त केलीय...

'इंडिया इंटरनॅशनल बुलियन एक्सचेंज' मार्फत होणाऱ्या मोठ्या व्यवहारांना फटका बसलाय.. 10 किलो किंवा 100 किलोसारख्या मोठ्या ऑर्डर्स पूर्ण करणे छोट्या आणि विखुरलेल्या परवान्यांमुळे जिकिरीचं ठरतयं... सोन्याचा नवीन कोटा जाहीर न झाल्यानं अनधिकृत व्यापार आणि तस्करीत वाढ होण्याची भीती निर्माण झालीय...

सोन्याच्या आयातीवर निर्माण झालेली ही तंणावपूर्ण परिस्थिती आणि परवान्यांची टंचाई पाहता, देशांतर्गत बाजारात सोन्याचा तुटवडा जाणवणार आहे.... पुरवठा कमी आणि मागणी कायम राहिल्यास आगामी काळात सोने आणि चांदीच्या किंमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जातेय...त्यामुळे सरकार काय भूमिका घेणार याकडे देशाचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Janshatabdi Express : जनशताब्दी एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड; पेण स्थानकात ३ तासांपासून रेल्वे रखडली, प्रवाशांचे हाल

Aloo Tikki Recipe: संध्याकाळच्या नाश्त्यासाठी घरच्या घरी बनवा कुरकुरीत आलू टिक्की; वाचा सोपी रेसिपी

Dahi : आंबट दही फेकून देऊ नका,  ५०% लोकांना फायदे माहीतच नाहीत, ५ वा उपाय थेट पैसे वाचवेल

Maharashtra News Live Update: आरक्षण उपवर्गीकरणासाठी मुंबईत मातंग समाज आक्रमक

Yuzvendra Chahal: युजवेंद्र चहलचा क्रिकेट टीमला अलविदा, पोस्ट पाहून चाहते संभ्रमात

SCROLL FOR NEXT