Gold- Silver Price Today Saam tv
बिझनेस

Gold Price: सोन्याच्या दरात मोठी घसरण, १० तोळे सोनं ३,३०० रुपयांनी स्वस्त; २२ आणि २४ कॅरेटचे आजचे दर किती?

Gold- Silver Price Today: सोनं-चांदीचे नवे दर समोर आले आहेत. सोन्याच्या दरात आज घसरण झाली तर चांदीचे दर वाढले आहेत. आज सोनं-चांदी खरेदी करण्यापूर्वी आजचे १८, २२ आणि २४ कॅरेटचे दर किती आहेत ते घ्या जाणून...

Priya More

Summary -

  • आज सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली

  • आज चांदीचे दर मात्र वाढले आहेत

  • २४ कॅरेट सोनं प्रति तोळा ३३० रुपयांनी कमी झाले

  • २२ आणि १८ कॅरेट सोन्याचे दरही कमी झालेत

सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. पण चांदीचे दर मात्र वाढले आहेत. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात वाढ झाली. पण आज आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घट झाली आहे. त्यामुळे ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आज २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये ३३० रुपयांनी घट झाली आहे. तर १ ग्रॅम चांदीच्या दरात १ रुपयांनी वाढ झाली आहे. आज सोनं-चांदी खरेदी करायचा तुम्ही प्लान करत असाल तर आजचे १८, २२ आणि २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याचे दर आणि चांदीचे दर किती आहेत ते जाणून घ्या...

गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, आज २४ कॅरेटच्या सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरात ३३० रुपयांनी घट झाली आहे. २४ कॅरेटचे एक तोळा सोनं खरेदीसाठी आज तुम्हाला १,३०,०९० रुपये खर्च करावे लागणार आहेत. तर २४ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये तब्बल ३,३०० रुपयांनी घसरण झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला १३,००,९०० रुपये खर्च करावे लागणार आहेत. सोमवारी हेच सोनं १३,०४,२०० रुपयांना विकले गेले.

आज २२ कॅरेटच्या सोन्याच्या दरात देखील घट झाली आहे. आज २२ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये ३०० रुपयांनी घट झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला १,१९,२५० रुपये खर्च करावे लागणार आहे. तर २२ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये तब्बल ३,००० रुपयांची घसरण झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला ११,९२,५०० रुपये खर्च करावे लागणार आहेत. हेच सोनं सोमवारी ११,९५,५०० रुपयांना विकले गेले होते.

तर २४ आणि २२ कॅरेटच्या सोन्यापाठोपाठ आज १८ कॅरेटच्या सोन्याच्या दरात देखील मोठी घसरण झाली आहे. आज १८ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरात २५० रुपयांनी घसरण झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी आज तुम्हाला ९७,५७० रुपये खर्च करावे लागतील. तर आज १८ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये २,५०० रुपयांनी घसरण झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी आज तुम्हाला ९,७५,७०० रुपये खर्च करावे लागणार आहेत. सोमवारी हेच सोनं ९,७८,२०० रुपयांना विकले गेले होते. सोन्याच्या दरात आज घसरण झाल्यामुळे आज सोनं खरेदी करण्याची चांगली संधी आहे.

दरम्यान, आज सोन्याच्या दरात जरी घसरण झाली असली तरी चांदीच्या दरात मात्र वाढ झाली आहे. त्यामुळे आज चांदी खरेदी करताना तुमच्या खिशावर ताण येणार आहे. आज १ ग्रॅम चांदीच्या दरात १ रुपयांनी वाढ झाली आहे. १ ग्रॅम चांदी खरेदीसाठी आज तुम्हाला १९० रुपये खर्च करावे लागणार आहे. तर १ किलो चांदीच्या दरामध्ये तब्बल १,००० रुपयांनी वाढ झाली आहे. ही चांदी खरेदीसाठी आज तुम्हाला १,९०,००० रुपये खर्च करावे लागणार आहे. त्यामुळे आज चांदी खरेदी करताना तुमच्या खिशाला कात्री लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight Loss : लाइफस्टाइलमध्ये करा 'हे' ३ बदल; फक्त ३० दिवसांत वजन होईल कमी अन् दिसाल सडपातळ

Maharashtra News Live Update: दहीहंडीत अश्लील नृत्य; डान्सर निशा मुंबईकर, शुभांगी थोरातसह ८ जणींवर गुन्हा

8th Pay Commission: केंद्रीय पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! ₹22,450 पेन्शन वाढून ₹57,697 होणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

IAS Transfer : मोठा प्रशासकीय फेरबदल! २७ IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती? वाचा

Gram Panchayat: ग्रामीण राजकारणात बदल! मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सरपंचांचे अधिकार संपले?

SCROLL FOR NEXT