Gold Price Today saam tv
बिझनेस

Gold Price Today: सोन्याच्या घसरणीला अखेर ब्रेक, दर पुन्हा वाढले; जाणून घ्या आजची किंमत

Gold Price Today: आज म्हणजेच २८ नोव्हेंबर रोजी सोन्याच्या भावात वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. आजच्या दिवशी काय आहे सोन्याचा भाव पाहूयात.

Surabhi Jayashree Jagdish

देशात अनेक ठिकाणी लग्नाचा सिझन सुरु आहे. यावेळी वर असो किंवा वधू प्रत्येकाच्या कुटुंबाचं लक्ष हे सोन्याच्या भावांकडे असतं. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सोन्याचा भाव घसरत होता. मात्र आज म्हणजेच २८ नोव्हेंबर रोजी सोन्याच्या भावात वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. आजच्या दिवशी काय आहे सोन्याचा भाव पाहूयात.

मनी कंट्रोलच्या वेबसाईटनुसार, गुरुवारी 28 नोव्हेंबर रोजी 10 ग्रॅम सोनं महागलंय. दोन दिवस सोन्याच्या दरात घसरण झाल्यानंतर गुरुवारी सोन्याच्या दरात वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय. बुधवारच्या तुलनेत गुरुवारी सोन्याच्या दरात 300 रुपयांनी वाढ झालीये. 22 कॅरेट सोन्याचा भाव 71,200 रुपयांपर्यंत आहे. तर दुसरीकडे 24 कॅरेट सोन्याचा भाव 77,600 रुपये आहे.

आज देशात चांदीचा भाव कसा?

देशात आज चांदीच्या भावामध्ये ना घट झालीये ना वाढ झालीये. देशात एक किलो चांदीची किंमत फक्त 89,500 रुपये आहे. चांदीच्या आजच्या दिवशी कोणताही बदल झालेला नाही.

देशात का महाग झालं सोनं?

सलग दोन दिवस घसरणीनंतर आज सोन्याच्या भावात वाढ झाल्याची माहिती आहे. गेल्या दोन दिवसांत सोन्याच्या दरात 1300 रुपयांनी घट झालीये. तज्ज्ञांट्या म्हणण्यानुसार, सोन्याचा व्यापार एका श्रेणीत होतो. किंचीत वाढ झाल्यावर त्यामध्ये घटही होते. 2025 मध्ये सोन्याच्या किमती चांगला परतावा देतील असं तज्ज्ञांचं मत आहे.

विविध शहरांतील १० ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घेऊ

मुंबई

22 कॅरेट सोनं - 71,050 रुपये

24 कॅरेट सोनं - 77,510 रुपये

पुणे

22 कॅरेट सोनं - 71,050 रुपये

24 कॅरेट सोनं - 77,510 रुपये

लखनऊ

22 कॅरेट सोनं - 71,200 रुपये

24 कॅरेट सोनं - 77,510 रुपये

जयपूर

22 कॅरेट सोनं - 71,200 रुपये

24 कॅरेट सोनं - 77,660 रुपये

नवी दिल्ली

22 कॅरेट सोनं - 71,200 रुपये

24 कॅरेट सोनं - 77,660 रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या आंदोलनाला यश, पेलेट गनप्रकरणी अखेर गुन्हा, FIR मध्ये कुणाची नावं?

Vangyachi Chatni Recipe : गरमागरम भाकरी अन् वांग्याची झणझणीत चटणी, चव इतकी भन्नाट की विचारू नका!

Maharashtra News Live Update: आंबेगावच्या पोषण आहारावर ग्रामस्थांचा आक्षेप; काळवाडीत धान्याचे सॅम्पल घेऊन तपासणी सुरू

Perfume Tips: महागडा परफ्यूम लावूनही काही वेळात सुगंध गायब होतोय? 'या' चुका टाळा, फ्रॅग्रन्स राहील दिवसभर!

Saturday Horoscope : मेहनीचं फळ मिळेल, ५ राशींचे भाग्य चमकणार; वाचा शनिवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT