Gold and Silver Prices Crash meta ai
बिझनेस

Gold Price Today : खुशखबर! दिवाळीपूर्वी सोने-चांदी झालं स्वस्त! ग्राहकांसाठी मोठा दिलासा, जाणून घ्या आजचा भाव

Silver Price Today : सोनं-चांदीच्या दरामध्ये गेल्या काही दिवसांपासून घसरण होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

Sakshi Sunil Jadhav

सणासुदीच्या दिवसांमध्ये सोनं- चांदी करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. गेल्या चार व्यावसायिक दिवसांमध्ये सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. दिलेल्या माहितीनुसार, सोनं ४,७९६ रुपयांनी, तर चांदी तब्बल १६,५०३ रुपयांनी स्वस्त झालं आहे.त्यामुळे ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

चांदीचे दर घसरले

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या (IBJA) आकडेवारीनुसार, चांदीचा दर प्रति किलो ५,३६२ रुपयांनी घसरून १.९४ लाख रुपयांवर आला. गुरुवारी चांदीचा दर २ लाख रुपयांच्या आसपास होता. जवळपास दहा महिन्यांनंतर चांदी परत दोन लाख रुपयांच्या खाली आल्याची माहिती मिळाली. १६ ऑक्टोबर रोजी चांदीचा दर २.१० लाख रुपये प्रति किलो होता. त्यानंतर झालेल्या घसरणीमुळे चांदी खरेदी करणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

सोन्याचे दरही घसरले

१० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर १,०६४ रुपयांनी कमी होऊन १.४१ लाख रुपयांवर आला. २२ ऑक्टोबर रोजी सोन्याचा दर १.४३ लाख रुपये होता. गेल्या चार व्यावसायिक दिवसांमधल्या घसरणीमुळे सोन्याच्या किमतीतही मोठा फरक पडला आहे.

सोनं-चांदीच्या दरात चढ- उतार का होतात?

वेगवेगळ्या शहरांमध्ये सोनं-चांदीचे दर बदलण्यामागे वाहतूक आणि सुरक्षेचा खर्च, स्थानिक मागणी-पुरवठा, ज्वेलर्स असोसिएशनचे दर आणि व्यापाऱ्यांकडच्या जुन्या साठ्याची खरेदी किंमत अशी विविध कारणे आहेत. त्यामुळे एकाच दिवशी वेगवेगळ्या शहरांमधल्या दरांमध्ये फरक दिसू शकतो.

विक्रमी दरापासून चांदी मोठ्या प्रमाणात स्वस्त

दिलेल्या माहितीनुसार, २९ जानेवारी रोजी चांदीचा दर ३.८६ लाख रुपये प्रति किलो या विक्रमी पातळीवर पोहोचला होता. त्यानंतर चांदीच्या दरात मोठी घसरण झाली. त्याच दिवशी सोन्यानेही १.७६ लाख रुपये प्रति १० ग्रॅम अशी उच्च पातळी गाठली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

साखरपुड्यानंतर घराकडे येताना काळाचा घाला, भीषण अपघातात तिघांचा मृत्यू, मृतदेह काढण्यासाठी बोलवावा लागला JCB

Refrigerator Placement: किचनमध्ये फ्रीज ठेवण्याची योग्य दिशा कोणती? वास्तू शास्त्रात सांगितलेत महत्त्वाचे नियम

Maharashtra News Live Update: जुन्या कसारा घाटात वाहतूक कोंडी

Marathi Actress Prajakta : 'Gen Z च्या नावाखाली हि**, समलिंगी...'; अभिनेत्री प्राजक्तावर आक्षेपार्ह कमेंट, नेटकरी संतापले

Diwali Faral : ना तूप, ना तेल! तरीही चवीला स्वादिष्ट; दिवाळी फराळ बनवण्याची खास ट्रिक लगेच वाचा

SCROLL FOR NEXT