Girl Child Investment Plans 2023 Saam Tv
बिझनेस

Girl Child Investment Plans: मुलीच्या सुरक्षित भविष्यासाठी 'या' योजनेत दररोज करा फक्त 166 रुपयांची गुंतवणूक, मिळणार 33 लाख

Girl Child Investment Plans 2023: मुलीच्या सुरक्षित भविष्यासाठी 'या' योजनेत दररोज करा फक्त 166 रुपयांची गुंतवणूक, मिळणार 33 लाख

Satish Kengar

Mutual Fund SIP: 

तुम्हीही तुमच्या मुलीच्या सुरक्षित भविष्यासाठी चांगल्या योजनते गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. आज आम्ही तुम्हाला एका अतिशय चांगल्या गुंतवणूक योजनेबद्दल सांगणार आहोत, जिथे तुम्ही तुमच्या मुलीच्या नावावर गुंतवणूक करू शकता आणि मॅच्युरिटीच्या वेळी चांगली रक्कम मिळवू शकता.

आम्ही म्युच्युअल फंड योजनेबद्दल बोलत आहोत. म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन असते. परंतु गुंतवणुकीच्या या क्षेत्रात परतावा मिळण्याची शक्यता देखील खूप जास्त असते. गुंतवणुकीच्या या क्षेत्रातून अनेकांना चांगला परतावा मिळाला आहे. तुम्ही दरदरोज 166 म्हणजेच महिन्याला 5 हजार रुपये गुंतवून 33.4 लाख रुपये मिळवू शकता. ते कसं याचबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत.

यासाठी सर्वात आधी तुम्हाला चांगली म्युच्युअल फंड योजना निवडावी लागेल. याबद्दल तुम्हाला चांगली आर्थिक माहिती नसेल, अशा परिस्थितीत तुम्ही तज्ञांच्या मदतीने चांगली म्युच्युअल फंड योजना निवडू शकता.  (Latest Marathi News)

म्युच्युअल फंड योजना निवडल्यानंतर त्यात एसआयपी करावी लागते. SIP केल्यानंतर, तुम्हाला 17 वर्षे दरमहा 5,000 रुपये गुंतवावे लागतील. 17 वर्षांच्या या गुंतवणुकीच्या कालावधीत, दरवर्षी अंदाजे 12 टक्के परतावा मिळण्याची अपेक्षा करावी.

असे झाल्यास, 17 वर्षांनंतर तुम्ही मॅच्युरिटीच्या वेळी 33.4 लाख रुपये जमा करू शकाल. गुंतवणुकीच्या कालावधीत तुम्हाला एकूण 10.2 लाख रुपये गुंतवावे लागतील. तुमच्या गुंतवणुकीवर एकूण 23.2 लाख रुपयांची संपत्ती वाढेल. तुम्ही तुमच्या मुलीच्या लग्नासाठी मॅच्युरिटीच्या वेळी मिळालेले 33.4 लाख रुपये वापरू शकता किंवा हे पैसे तिच्या उच्च शिक्षणासाठी वापरू शकता.  (Utility News)

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT