IAS Sarjana Yadav Saam Tv
बिझनेस

Success Story: TRAI मधील नोकरी सोडली; UPSC मध्ये दोनदा अपयश, हार मानली नाही; तिसऱ्या प्रयत्नात केली क्रॅक; IAS सर्जना यादव यांचा प्रवास

Success Story Of IAS Sarjana Yadav: आयएएस सर्जना यादव यांनी कोणत्याही कोचिंग क्लासेसशिवाय यूपीएससी परीक्षा क्रॅक केली आहे. त्यांना दोनदा अपयश येऊनही त्यांनी पुन्हा प्रयत्न केले आणि यश मिळवले.

Siddhi Hande

यूपीएससी ही देशातील सर्वात अवघड परीक्षा आहे. यूपीएससी परीक्षा देऊन अनेकांना आयएएस, आयपीएस अधिकारी व्हायचे असते. ही परीक्षा पास करणे खूप जास्त अवघड आहे. दिवसरात्र अभ्यास केल्यानंतर तुम्हाला या परीक्षेत यश मिळते. असंच यश आयएएस सर्जना यादव (IAS Sarjana Yadav) यांना मिळालं. त्यांनी कोणत्याही कोचिंग क्लासेसशिवाय यूपीएससी परीक्षा क्रॅक केली आहे.

सर्जना या २०१९ च्या बॅचच्या आयएएस अधिकारी (IAS) आहेत. सर्जना यादव यांनी तीन वेळा यूपीएससी परीक्षा दिली. पहिल्या दोन प्रयत्नात त्यांना अपयश मिळाले. परंत त्यांनी हार मानली नाही. त्यांनी सतत प्रयत्न केले. त्यांनी तिसऱ्या प्रयत्नात १२६ रँक मिळवली.

सर्जना यांनी कोणत्याही कोचिंग क्लासेसशिवाय हे यश मिळवले आहे.सर्जना यांनी दिल्लीतून आपले शिक्षण पूर्ण केले. त्यांनी दिल्ली टेक्नोलॉजिकल युनिव्हर्सिटी मधून ग्रॅज्युएशन पूर्ण केले. सर्जना यादव यांनी TRAI मध्ये रिसर्च ऑफिसर म्हणूनदेखील काम केले होते. त्याचसोबत त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी सुरु केली. परंतु नोकरी करताना त्यांना परीक्षेचा अभ्यास करणे कठीण जात होते. त्यामुळे त्यांनी २०१८ मध्ये नोकरी सोडली आणि फुल टाइम अभ्यास केला. याचाच परिणाम असा की २०१९ मध्ये त्यांना यूपीएससी परीक्षेत यश मिळाले. त्या आयएएस झाल्या.

सर्जना यांच्या मते यूपीएससी परीक्षेची तयारी आपल्या क्षमतेनुसार करायला हवी. त्यासाठी अभ्यासाचा वेळ निश्चित करणे गरजेचे आहे. संपूर्ण अभ्यासक्रमाचा सराव करायचा हवा. याचसोबत उत्तरे लिहण्यावर भर द्यायला हवा.

सर्जना यादव या सोशल मीडियावरदेखील खूप सक्रिय आहेत. त्या नेहमी काही न काही पोस्ट करत असतात. परीक्षेच्या तयारीसाठी पुस्तकांची निवड योग्य पद्धतीने करा, असं त्यांनी सांगितलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Pune Tourist Spots: मुंबई-पुण्याजवळ वसलेल्या स्वर्गाहून सुंदर 'या' बेस्ट वीकेंड डेस्टिनेशनला द्या भेट

Maharashtra Live News Update: मुंबईच्या अंधेरी MIDC परिसरात सीप्ज कंपनीला भीषण आग

Oracle Layoff: कामावर येऊ नका; एका रात्रीत ३०,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढलं | VIDEO

Toll Price Hike: प्रवास महागला! महाराष्ट्रातील टोलच्या दरात मोठी वाढ, आता किती पैसे मोजावे लागतील ?

एकनाथ शिंदेंनी पहिला डाव टाकला, शिवसेनेत वेगवान हालचाली; श्रीकांत शिंदेंसह ३९ नेत्यांवर मोठी जबाबदारी

SCROLL FOR NEXT