ATM  Saam Tv
बिझनेस

नोकरदारांसाठी महत्वाची बातमी, ATMमधून PF काढण्याच्या अटी काय? वाचा एका क्लिकवर

provident fund update : तुम्ही नोकरी करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.. कारण आता तुमचा पीएफ ATM मधून काढता येणार आहे...ही योजना कधीपासून सुरु होणार आहे? पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट....

Saam Tv

भरत मोहळकर, साम टीव्ही

गेल्या अनेक दिवसांपासून पीएफची रक्कम थेट एटीएममधून काढता येण्याची चर्चा सुरु होती.. मात्र आता केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय यांनी पीएफच्या एटीएमविषयी मोठं भाष्य केलंय...देशातील कर्मचाऱ्यांना चांगल्या सेवा देण्यासाठी कामगार मंत्रालय IT प्रणालीत सुधारणा करत आहे. त्याचा फायदा कोट्यावधी EPFO खातेधारकांना होणार आहे... मात्र ही सुविधा कशी असेल? पाहूयात...

ATMमधून PF काढता येणार

- कर्मचारी भविष्य निर्वाह निधीचे पैसे थेट एटीएममधून काढता येणार

- एटीएम आणि डेबिट कार्डप्रमाणेच एक कार्ड देण्यात येईल

- या कार्डद्वारे पीएफचे पैसे एटीएममधून काढता येतील

- जून 2025 नंतर ही सुविधा सुरु होण्याची शक्यता

- जमा झालेल्या पीएफच्या 50 टक्केच रक्कम काढता येणार

-अडचणीच्या काळात मर्यादेपेक्षा जास्त रक्कम काढता येईल (अटी लागू)

- देशातील 7 कोटी नोकरदार वर्गाला याचा फायदा मिळणार

जून महिन्यापर्यंत EPFO च्या सॉफ्टवेअरचं काम पूर्ण होईल. त्यानंतर कर्मचाऱ्यांना थेट एटीएममधून पीएफचे पैसे काढण्याची सुविधा मिळणार आहे. ही सिस्टीम बँकेच्या सिस्टीमप्रमाणे चालणार आहे....त्यामुळे जूननंतर आपला भविष्य निर्वाह निधी थेट एटीएममधून काढता येईल. सरकारच्या या निर्णयाचा देशातील 7 कोटी लोकांना फायदा होणार आहे. त्यामुळे अडीअडचणीच्या काळात भविष्य निर्वाह निधीचा वापर नोकरदारांना लगेचच करता येईल..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चांदी वाहून नेणारी व्हॅन उलटली

Gold Rate Today : पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्या, पण सोनं-चांदी झालं स्वस्त; जाणून घ्या २४k, २२k चे ताजे दर

Shehnaaz Gill Dating RCB Cricketer News: आरसीबीच्या 'या' खेळाडूवर शहनाज गिल फिदा? 'त्या' एका फोटोमुळे रंगल्या अफेअरच्या चर्चा

Actors Wife Money Fraud: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याच्या पत्नीची मोठी फसवणूक; BMC च्या बड्या अधिकाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

High Blood Sugar: ही ७ लक्षणं दिसली तर समजा तुमच्या रक्तात साखरेचं प्रमाण वाढतंय

SCROLL FOR NEXT