EPFO Rules saam tv
बिझनेस

EPFO Rules: निवृत्तीनंतर PF वर व्याज मिळतं की नाही? जाणून घ्या महत्त्वाचा नियम

PF Withdrawal Rules: रिटायरमेंटनंतर पीएफ खात्यावर किती काळ व्याज मिळतं, हे कर्मचाऱ्याचे रिटायरमेंटचं वय आणि खात्याच्या स्थितीवर अवलंबून असतं.

Sakshi Sunil Jadhav

नोकरीत असताना अनेक कर्मचारी आपल्या पगारातून दर महिन्याला भविष्य निर्वाह निधी (PF) मध्ये पैसे जमा करतात. रिटायरमेंटनंतर हाच निधी आर्थिक आधार ठरतो. पण रिटायरझाल्यानंतर पीएफ खात्यातल्या रकमेवर किती काळ व्याज मिळतं आणि पैसे काढायला उशीर झाल्यावर काय होतं, याबद्दल अनेकांच्या मनात प्रश्न असतात. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) नियमांनुसार, या बाबी समजून घेणं महत्त्वाचं आहे.

रिटायरमेंटनंतर ३ वर्षापर्यंतच व्याज मिळतं?

वयाच्या ५८ व्या वर्षी रिटायर झालेल्या कर्मचाऱ्याच्या EPF खात्यातल्या पात्र रकमेवर पुढचे तीन वर्षे म्हणजे, वयाच्या ६१ वर्षांपर्यंत व्याज मिळू शकतं. त्यामुळे रिटायर झाल्यावर संपूर्ण पीएफ रक्कम काढणं गरजेचं आहे, असं नाही. कर्मचारी आपल्या आर्थिक गरजा आणि परिस्थितीनुसार पैसे काढण्याचं नियोजन करू शकतो.

मात्र, व्याज मिळण्यासंदर्भातले नियम खातं कोणत्या प्रकारात मोडतं आणि त्याची स्थिती काय आहे, यावर अवलंबून असू शकतात. त्यामुळे संबंधित खात्याला लागू असलेले नियम EPFO कडून तपासून घेणं आवश्यक आहे.

तीन वर्षांनंतर पीएफ खात्याचं काय होतं?

रिटायरमेंटनंतर, तीन वर्षे पैसे काढले नाहीत तर ते खातं निष्क्रिय (Inoperative) होऊ शकतं. त्यामुळे खात्यातली रक्कम विनाकारण दीर्घकाळ पडून ठेवण्याऐवजी तिची स्थिती तपासणं महत्त्वाचं आहे.

पीएफचे पैसे काढण्याआधी काय लक्षात ठेवावं?

PF मधले पैसे काढण्याआधी कर्मचाऱ्यांनी आपलं खातं, उपलब्ध शिल्लक आणि लागू असलेले नियम तपासायला हवेत. EPFO च्या अधिकृत पोर्टलवरून खात्याची माहिती मिळवता येते. आवश्यक असेल तर संबंधित कार्यालयाशी संपर्क साधून व्याज आणि पैसे काढण्याच्या पात्रतेबाबत खात्री करून घ्यावी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CNG Hike : मोठी बातमी! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात सीएनजी महागला; आजचे ताजे दर किती? वाचा

Political News: मोठी बातमी! काँग्रेसची ताकद वाढणार, ५ माजी मुख्यमंत्री घरवापसी करण्याच्या तयारीत

Medical Device Reuse: सरकारचा रुग्णालयांना मोठा दणका! सिंगल यूज मेडिकल डिव्हाइस पुन्हा वापरण्यास मनाई, रुग्णांच्या सुरक्षेसाठी उचललं मोठं पाऊल

Heart Attack : दोन मजले चढताच दम लागतो, दुर्लक्ष करू नका; हार्ट अटॅकचा तर संकेत नाही ना?

Maharashtra News Live Update: हॉस्टेलमधील शिक्षकाच्या त्रासाला कंटाळून 13 वर्षीय विद्यार्थ्याने जीवन संपवलं

SCROLL FOR NEXT