EPFO NEW PF WITHDRAWAL RULES saam tv
बिझनेस

PF काढण्याचे नियम बदलले; कोणत्या कोणत्या कारणांसाठी काढता येणार पैसे?

Big Update for Employees: भविष्य निर्वाह निधी म्हणजेच प्रॉव्हिडंट फंड काढण्याचे जुने नियम आता बदलले आहेत. आजारपण, शिक्षण, लग्नासाठी किंवा घर घेण्यासाठी आगाऊ रक्कम काढण्याचे नियम आता अधीक सुटसुटीत करण्यात आलेत.

Girish Nikam

भविष्य निर्वाह निधी म्हणजेच प्रॉव्हिडंट फंड प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी मोठा आर्थिक आधार असतो.

आपत्कालीन परिस्थितीत पीएफमधून किती आगाऊ रक्कम काढू शकता? असा प्रश्न सगळ्यांनाच पडतो. मात्र आता जुने नियम बदलले आहेत. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने म्हणजेच EPFOने पीएफ खात्यातून अंशतः पैसे काढण्याचे नियम सोपे केले आहेत. नवीन नियमांनुसार, आजारपण, मुलांचे शिक्षण, विवाह, घर खरेदी किंवा बांधकाम यांसारख्या कारणांसाठी पैसे काढण्याच्या नियमांमध्ये बदल झाला आहे.

PF काढण्याचे नियम बदलले

आगाऊ रकमेच्या दाव्यांची 3 श्रेणींमध्ये विभागणी करण्यात आली आहे.

अत्यावश्यक गरजा, घराच्या गरजा आणि विशेष परिस्थिती अशा तीन श्रेणी

असणार आहेत. वैद्यकीय उपचारांसाठी पैसे काढण्यावर मर्यादा नसणार आहे. उच्च शिक्षण किंवा अभ्यासाच्या खर्चासाठी, तुम्ही तुमच्या संपूर्ण सेवेदरम्यान जास्तीत जास्त १० वेळा आगाऊ रक्कम घेऊ शकता.

तसेच स्वतःचे लग्न, मुलांचे लग्न किंवा भावंडांच्या लग्नासाठी संपूर्ण सेवेदरम्यान पाच वेळा पीएफ निधी काढू शकता.

तुम्ही घर किंवा प्लॉट खरेदी करण्यासाठी, बांधण्यासाठी, गृहकर्जाचे हप्ते भरण्यासाठी किंवा घराची दुरुस्ती करण्यासाठी 5 वेळा आगाऊ रक्कम काढू शकता. तथापि, आपत्कालीन परिस्थितीसाठी, तुम्ही तुमच्या सेवेदरम्यान फक्त 2 वेळा आगाऊ रक्कम काढू शकता.

ईपीएफ सदस्यत्वाला 12 महिने पूर्ण झाल्यावरच कर्मचारी आगाऊ रक्कम काढण्यास पात्र ठरतो. ईपीएफ खात्यात जमा असलेल्या एकूण रकमेच्या, ज्यामध्ये कर्मचारी आणि कंपनीचे योगदान तसेच त्यावरील व्याजाचा समावेश आहे. कमाल 75% आगाऊ रक्कम काढता येते. मुख्य म्हणजे तुम्ही ऑनलाइन अर्ज करुन रक्कम काढू शकता. त्यासाठी

ईपीएफओच्या अधिकृत पोर्टलवर अर्ज करता येतो. अर्ज करण्यापूर्वी, खात्याचे केवायसी म्हणजेच बँकेची माहिती, पॅन आणि आधार तपशील पूर्ण असणे आवश्यक आहे. बदललेले नियम कोट्यवधी कर्मचाऱ्यांसाठी नक्कीच मोठे दिलासा देणारे आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

यंदाही गणेशोत्सवात कोकणवासीयांचे हाल, मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी

Tea For Health: सकाळी रिकाम्या पोटी चहा पिणं कितपत योग्य?

निवडणुकीत भाजप उमेदवारासह पती आणि मुलाचे अपहरण; राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra News Live Update: गणेशोत्सवामुळे मनोज जरांगे यांनी आंदोलनाच्या तारखांचा पुनर्विचार करावा- केसरकर

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार, भरधाव कारच्या धडकेत सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू

SCROLL FOR NEXT