PF Withdrawal Facility google
बिझनेस

PF Withdrawal Facility : PF खातेदारांसाठी मोठी खुशखबर! PF काढण्याची पद्धत बदलणार, महिनाअखेरीस सुरू होणार नवी सुविधा

EPFO UPI Withdrawal Facility : कर्मचाऱ्यांचं मोठं टेन्शन मिटलं. सरकारने पीएफ संदर्भात अत्यंत महत्वाचा निर्णय घेतलाय. आता पीएफ मधून सहज पैसे काढता येणार आहेत. पुर्वीसारखी पैशांसाठी धावपळ करावी लागणार नाही.

Sakshi Sunil Jadhav


EPFO खातेधारकांसाठी महत्वाची बातमी

आता पीएफचे पैसे युपीआयने काढता येणार आहेत

नवी सुविधा सुरु करण्याची तारीख समोर आली आहे

प्रत्येक कर्मचाऱ्याचं ईपीएफओ अकाउंट असतं. त्यामध्ये दर महिन्याच्या पगारातली काही टक्के रक्कम जमा होत असते. हेच पैसे कर्मचार्‍यांच्या पीएफ आणि पेन्शन अकाउंटमध्ये जमा केले जातात. तसेच ते तुम्हाला एखाद्या आपात्कालीन परिस्थितीत काढता येतात. तुम्ही युपीआयच्या मदतीने थेट पैसे तुमच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करू शकता. पण या सुविधेची सुरुवात नेमकी कधी होणार? याबाबत अनेकांना प्रश्न पडले आहेत. याचबाबत मोठी अपडेट आपण जाणून घेणार आहोत.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना ७ कोटींहून जास्त सदस्यांसाठी मोठा बदल करण्याच्या तयारीत आहे. लवकरच सदस्यांना यूपीआय आणि एटीमने त्यांचा पीएफ काढता येईल. त्याने कर्मचार्‍यांना बँकेत लांबच्या लांब रांगा लावण्याची गरज पडणार नाही. सरकारी सूत्रांनी गुरुवारी दिलेल्या माहितीनुसार ही नवीन प्रक्रिया या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ही प्रक्रिया सुरू होईल अशी शक्यता आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीमध्ये आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी ८.२५ टक्के व्याज कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये याच महिन्यात जमा केलं जाईल. ही रक्कम त्यांच्या जमा पैशांचं व्याज असेल. श्रम मंत्रालयातल्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, EPFO 2.01 अंतर्गत सेंन्ट्रलाइज्ड आयडी सिस्टीमचं काम पूर्ण झालं आहे. या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत UPI च्या मदतीने तुम्ही पैसे काढू शकता. त्यामध्ये कर्मचारी त्यांची दाव्याची रक्कम (Claim Amount) UPI च्या मदतीने त्यांच्या खात्यात जमा करू शकतात. तसेच एटीएमच्या मदतीने ही रक्कम काढू शकतात.

महत्वाची माहिती म्हणजे ही सुविधा सुरू करण्याआधी EPFO च्या सर्व्हरमध्ये काही बदल केली जाऊ शकतात. यासाठी ३ दिवस सर्व्हर ब्लॅकआउट करण्यात येईल अशी शक्यता आहे. या तीन दिवसात काही ऑनलाइन सेवा तात्पुरत्या बंद होतील अशी शक्यता आहे. EPFO 2.01 च्या अंतर्गत सुरु होणाऱ्या सुविधेला अपडेट करण्यासाठी ही प्रोसेस फॉलो करणं गरजेचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Times Square Firing: भर दिवसा गोळीबाराचा थरार; मोठ्या आवाजाने रस्त्यावर नागरिकांची धावाधाव, अमेरिका हादरली

महाराष्ट्रावरील ढग गायब, पाऊस गेला कुणीकडे? पुढील २ दिवस कसं असेल हवामान?

PM Kisan : २ लाख शेतकऱ्यांना मोठा झटका, पीएम किसान योजनेचे पैसे बंद, तुमचे नाव तर नाही ना?

Maharashtra News Live Update: मुंबईत पाऊस, मुंबईकरांना दिलासा

Pune Nashik Railway: पुणे-नाशिक रेल्वे मार्गात महत्वाचा बदल; ताशी १६० किमी वेगाने होणार प्रवास, कसा असेल संपूर्ण लोहमार्ग?

SCROLL FOR NEXT