EPFO WhatsApp Channel saam tv
बिझनेस

PF Balance WhatsApp : EPFO च्या 'या' सेवेमुळे कर्मचाऱ्यांना दिलासा! आता WhatsApp वर मिळणार PF खात्याची माहिती, पण कशी? वाचा...

EPFO Update : पीएफ खात्यातला बॅलन्स WhatsAppवर तपासता येतो का? ईपीएफओच्या सेवांबाबत जाणून घ्या.

Sakshi Sunil Jadhav

नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी पीएफ (PF) खात्यातली उरलेली रक्कम आणि योगदानाची माहिती जाणून घेणं महत्त्वाचं असतं. यासाठी अनेकदा EPFOच्या पोर्टलवर लॉगिन करावं लागतं. मात्र, WhatsApp वरून पीएफ खात्याची माहिती मिळवण्याची सुविधा उपलब्ध असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचं काम सोपं होऊ शकतं. ही सुविधा वापरण्याआधी संबंधित WhatsApp नंबरची अधिकृतता तपासणं महत्त्वाचं आहे.

WhatsApp वरून PF खात्याची माहिती मिळणार?

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) ही कर्मचाऱ्यांच्या पीएफ खात्याशी संबंधित सेवा पुरवते. पीएफ खात्यात किती पैसे जमा झाले आहेत, कंपनीने किती योगदान दिलं आहे आणि खात्यातल्या व्यवहारांची माहिती काय आहे, हे जाणून घेण्याची गरज कर्मचाऱ्यांना असते.

WhatsApp सारख्या माध्यमातून माहिती मिळाल्यावर कर्मचाऱ्यांना वारंवार पोर्टलवर लॉगिन करण्याची गरज कमी होऊ शकते. पण सर्व सभासदांना पीएफ बॅलन्सची माहिती देण्याची अधिकृत व्हॉट्सअॅप सेवा सुरू असल्याची खात्री उपलब्ध माहितीतून होत नाही.

पीएफ बॅलन्स कसा तपासायचा?

पीएफ खात्यातल्या शिल्लक तपासण्यासाठी सध्या कर्मचारी ईपीएफओच्या अधिकृत वेबसाइटचा किंवा उमंग (UMANG) अॅपचा वापर करू शकतात. तसेच, पात्र सभासद मिस्ड कॉल किंवा एसएमएस सेवेच्यामदतीनेही माहिती मिळवू शकतात. या सेवांसाठी नोंदणीकृत मोबाईल क्रमांक आणि आवश्यक खात्याची माहिती अपडेट असणं गरजेचं आहे.

पीएफ बॅलन्स तपासताना ईपीएफओच्या अधिकृत वेबासाइटवरूनच माहिती घ्यावी. अनोळखी WhatsApp नंबरवर आधार क्रमांक, बँक तपशील, पासवर्ड किंवा ओटीपी शेअर करू नका. तसेच WhatsApp वरून पीएफची माहिती मिळवण्यासाठी कोणताही क्रमांक वापरण्याआधी तो ईपीएफओच्या अधिकृत वेबसाइटवर दिलेला आहे का, हे तपासा. बनावट मसेज किंवा लिंकच्या साहाय्याने तुमची फसवणूक केली जाऊ शकते. त्यामुळे वैयक्तिक माहिती देताना सावध राहणं गरजेचं आहे.

पीएफची माहिती मिळवणं होणार सोपं?

डिजिटल सेवांमुळे पीएफ खात्याशी संबंधित माहिती मिळवणं जास्त सोपं होतंय. पण WhatsApp वरून पीएफ बॅलन्स तपासण्याच्या सुविधेबाबत अधिकृत पुष्टी झाल्यानंतरच संबंधित नंबर आणि वापरण्याची प्रोसेस निश्चित मानावी. तोपर्यंत ईपीएफओच्या अधिकृत वेबसाइट किंवा उमंग अॅपचा वापर करणं सुरक्षित ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Oil in Belly Button: रात्री झोपण्यापूर्वी नाभीमध्ये लावा 'हे' खास तेल; फायदे वाचून तुम्हीही व्हाल चकित

Diwali Chakli Recipe : पहिल्यांदाच भाजणीची चकली करताय? फॉलो करा स्टेप बाय स्टेप 'ही' रेसिपी

Maharashtra News Live Update: विधानपरिषदेचे उपसभापती सचिन आहीर करणार नव्या घरात प्रवेश

Pune News: राज्य सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, दिवाळीपूर्वी खात्यात जमा होणार बोनस; कुणाला किती रुपये मिळणार?

दसरा मेळाव्याआधी शिंदेसेनेचे टेन्शन वाढलं, सभेसाठी पदाधिकारी मिळेना?

SCROLL FOR NEXT