EPFO Employees’ Enrolment Campaign 2026: Eligibility, Benefits & Registration AI Image
बिझनेस

EPFO Alert: नोकरी सोडली तरी PF वर मिळणार व्याज? EPFO चा हा नियम नक्की जाणून घ्या

EPF Interest : नोकरी सोडल्यानंतर EPF खात्यावर व्याज मिळतं का? EPFO च्या माहितीनुसार व्याजासंबंधी नियम जाणून घ्या आणि ५८ वर्षापर्यंतच्या कालावधीबाबत महत्त्वाची माहिती समजून घ्या.

Sakshi Sunil Jadhav

तुम्ही तुमच्या कामात पीएफ जमा करत असाल तर तुमच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. खासगी क्षेत्रात काम करणारे अनेक कर्मचारी रियाटरमेंटच्या वयाआधीच नोकरी सोडतात. अशावेळी नोकरी सोडल्यानंतर आपल्या EPF खात्यावर व्याज मिळतं की नाही, असा प्रश्न अनेकांच्या मनात असतो. याबाबत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच EPFO ने सोशल मिडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर माहिती दिली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, एखाद्या कर्मचाऱ्याने वयाच्या ५५व्या वर्षी नोकरी सोडली, तर त्याच्या EPF खात्यावर ५८ वर्षांच्या वयापर्यंत व्याज मिळू शकते. म्हणजेच नोकरी सोडल्यानंतर पुढील तीन वर्षे खात्यातील रकमेवर व्याज जमा होईल. त्याचप्रमाणे, एखाद्या व्यक्तीने वयाच्या 40व्या वर्षी नोकरी सोडली, तरी ५८ वर्षांपर्यंत EPF खात्यावर व्याज मिळण्याची तरतूद असल्याचे सांगण्यात आले आहे.

मात्र, ५८ वर्षांनंतर पुढे व्याज जमा होत नाही, असा या माहितीत उल्लेख आहे. त्यामुळे ५०,५५ किंवा ५८ वर्षांच्या आसपास नोकरी सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी हा नियम विशेष महत्त्वाचा आहे.

दरम्यान, एखादा कर्मचारी ६० किंवा ६३ वर्षांच्या वयापर्यंत नोकरी करत असेल, तर त्याच्या EPF खात्यावर संबंधित कालावधीपर्यंत व्याज मिळण्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्यक्ष नोकरीचा कालावधी आणि खाते कधीपर्यंत सक्रिय राहते, यानुसार परिस्थिती बदलू शकते.

EPFO 3.0 मध्ये मिळणार नव्या सुविधा

EPFO कडून भविष्यात सदस्यांसाठी अनेक डिजिटल सुविधा आणण्याची तयारी सुरू आहे. यामध्ये जलद क्लेम सेटलमेंट, तसेच ATMच्या माध्यमातून PF मधून पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याची योजना असल्याचे सांगितले जाते. याशिवाय UPIच्या माध्यमातून PF निधीचा वापर आणि खात्यात पैसे ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया अधिक सोपी करण्याच्या दिशेनेही काम सुरू आहे. त्यामुळे नोकरी सोडण्याचा विचार करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी EPF खात्याचा कालावधी, व्याज आणि पैसे काढण्याचे नियम समजून घेणे महत्त्वाचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची तब्येत खालवली; तातडीनं रुग्णालयात दाखल

विधानपरिषद निवडणुकीत शिंदेसेना-भाजप आमनेसामने; महायुतीतला वाद चव्हाट्यावर

रामलीला मैदानावर रावणासोबत झुरळही जाळणार; स्वच्छ भारत अभियानाचा दावा की राजकीय निशाणा?

CJPच्या आंदोलनाआधीच दिपके पोलिसांच्या ताब्यात; दिल्लीत पुन्हा एकदा हायव्होल्टेज ड्रामा

तिकीट तपासणीवरून महिला प्रवासीचा टीसीसोबत वाद; कांदिवली स्टेशनवर नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT