EPFO 3.0 Proposal Google
बिझनेस

EPFO 3.0 : खासगी क्षेत्रातील कर्मचारी असो 'गिग वर्कर' प्रत्येकाला मिळणार पेन्शन? काय आहे संपूर्ण प्लॅन

PF Pension Scheme : EPFO 3.0 अंतर्गत गिग वर्कर्स, फ्रीलान्सर्स आणि असंघटित क्षेत्रातल्या कामगारांना पेन्शनचा लाभ देण्याचा प्रस्ताव चर्चेत आहे. मात्र केंद्र सरकारने अजून कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

Sakshi Sunil Jadhav

देशभरातल्या लाखो कर्मचारी आणि असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी EPFO 3.0 संदर्भात मोठी चर्चा सुरू आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकार अशा नवीन पेन्शन व्यवस्थेवर काम करतंय, ज्याचा फायदा फायदा फक्त नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच नाही, तर फ्रीलान्सर, ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर काम करणारे गिग वर्कर्स, छोटे व्यावसायिक आणि असंघटित क्षेत्रातल्या कामगारांनाही मिळू शकतो. पण या योजनेबद्दल सरकारकडून अजून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही.

सध्या EPF आणि EPS योजनेचा लाभ संघटित क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांना मिळत आहे. पण EPFO 3.0 चा उद्देश जास्तीत जास्त लोकांना रिटायरमेंटनंतर आर्थिक सुरक्षितता मिळावी हा आहे. या योजनेमध्ये व्यक्तीने रोज बचत केल्याने ती रक्कम सरकारी रोख्यांमध्ये गुंतवली जाऊ शकते आणि त्यावर व्याज मिळण्याची शक्यता आहे.

सुत्रांनुसार, रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळवण्यासाठी २ पर्याय असू शकतात. पहिला म्हणजे अॅन्युइटी प्लॅनच्या मदतीने दर महिन्याला ठरलेली पेन्शन घेणं आणि दुसरा म्हणजे सिस्टेमॅटिक विथड्रॉवल प्लॅनने (SWP) गरजेनुसार पैसे काढणं. त्यामुळे प्रत्येकाला आपल्या आर्थिक गरजेनुसार पर्याय निवडण्याची सुविधा मिळू शकते.

यामध्ये Target Retirement Sum (TRS) या नव्या सुविधेचाही समावेश आहे. याच्या मदतीने रिटायरमेंटच्या वेळी किती निधी हवा आहे हे आधीच निश्चित करता येईल. त्यानुसार महिन्याला किती बचत करावी लागेल, याची माहिती डिजिटल डॅशबोर्डवर पाहता येईल. तसेच खातं, बचत, संभाव्य पेन्शन आणि इतर तपशील रिअल-टाइममध्ये उपलब्ध होऊ शकतात.

या योजनेत कर्मचारी आणि रिटायरमेंटबरोबर सरकार, गिग प्लॅटफॉर्म, CSR फंड किंवा इतर संस्थांकडून सुद्धा योगदान मिळण्याचा प्रयत्न आहे. तसेच एकाच UAN अनेक कर्मचारी जोडण्याची सुविधाही उपलब्ध होऊ शकते. पण हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे की, EPFO 3.0 हा प्रस्ताव अजून मान्य केलेला नाही. तसेच याची अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jantar Mantar Protest: जंतरमंतरवर पुन्हा परिस्थिती बिघडली; विद्यार्थ्यांवर पुन्हा लाठीचार्ज, पोलिसांवर दगड, बाटल्या फेकल्या

नागपुरात धक्कादायक घटना! दुपारी सुट्टीच्या वेळी चक्कर आली; उपचारादरम्यान तिसरीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

Schools Closed: पालघर जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालय आणि अंगणवाड्यांना उद्या सुट्टी,काय आहे कारण जाणून घ्या

दिल्लीतील आंदोलनात मराठा एल्गार, पुन्हा हल्ला केल्यास सरकारचा माज उतरवणार

दिल्लीत शरद पवार-पंतप्रधान मोदींची भेट भेटीमागे नेमकं गुपित काय?

SCROLL FOR NEXT