Maruti Suzuki Alto Electric Car Saam Tv
बिझनेस

Maruti Suzuki Alto इलेक्ट्रिक अवतारात येणार? मिळणार हे जबरदस्त फीचर्स

Maruti Suzuki Cars: नवीन अल्टो इलेक्ट्रिक व्हर्जनमध्येही लॉन्च केली जाऊ शकते. नवीन अल्टोमध्ये काही नवीन पाहायला मिळेल? जाणून घेऊ…

Satish Kengar

देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकी भारतात आपल्या नवीन अल्टोवर काम करत आहे. आगामी मॉडेल सध्याच्या मॉडेलपेक्षा अनेक प्रकारे वेगळे असेल. एवढेच नाही तर नवीन अल्टोचे वजनही कमी असेल.

याशिवाय नवीन मॉडेलच्या डिझाइनमध्ये अनेक तांत्रिक बदल करण्यात येणार आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, नवीन अल्टो इलेक्ट्रिक व्हर्जनमध्येही लॉन्च केली जाऊ शकते. नवीन अल्टोमध्ये काही नवीन पाहायला मिळेल? जाणून घेऊ…

नवीन अल्टोचे वजन 100 किलोने कमी होणार

रिपोर्ट्सनुसार, सध्याच्या कारचे वजन 680 किलो आहे. तर नवीन अल्टोचे वजन 580 किलोपर्यंत खाली येऊ शकते. नवीन मॉडेलचा आकारही लहान असेल. कमी वजनामुळे नवीन अल्टोमध्ये चांगले मायलेज मिळू शकते.

नवीन अल्टोमध्ये मोठे बदल होण्याची अपेक्षा आहे आणि तिचे वजन कमी करण्यासाठी, कार लहान आणि चांगलं परफॉर्मन्स देणारे इंजिन यात वापरले जाऊ शकते. नुकत्याच लॉन्च झालेल्या नवीन स्विफ्टमध्ये Z12 इंजिनचा समावेश करण्यात आला आहे. हेच इंजिन आगामी नवीन Dezire, Wagon R, Baleno आणि Frontex मध्ये देखील दिसणार आहे.

सूत्रानुसार, नवीन अल्टोचे इलेक्ट्रिक व्हर्जन लॉन्च करण्याचीही तयारी सुरू आहे. विशेष बाब म्हणजे यामध्ये मोठे बॅटरी पॅकही वापरले जाऊ शकते. बॅटरीसोबतच तुम्हाला या वाहनातून सीएनजीचा पर्यायही मिळेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

White Clothes: अंत्यसंस्कारावेळी पांढरे कपडे का घालतात? कारण वाचून व्हाल आश्चर्यचकीत

डोनाल्ड ट्रम्प यांना बसला टॅरिफचा 'डंक'; सहा देशांकडून F-35 लढाऊ विमानांचा करार रद्द

ऐन निवडणुकीत गोळीबार, कुख्यात गुन्हेगाराची गोळ्या झाडून हत्या, परिसरात खळबळ

Ashish Deshmukh: 'जास्त कराल तर कापून काढू'; आमदार आशिष देशमुखांची विरोधकांना धमकी

दुसरं लग्न थेट गुन्हा ठरणार; तब्बल १० वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागणार

SCROLL FOR NEXT