Edible Oil Saam TV
बिझनेस

Edible Oil Price: चमचमीत खणाऱ्यांच्या जिभेला लागणार लगाम? खाद्य तेलांच्या किंमतीत वाढ

Edible Oil Price: धान्याच्या किंमतींनुसार काही तेलांचे दर वाढलेत तर काहींचे दर कमी झालेत.

साम टिव्ही ब्युरो

Food Oil Price:

सणासुदीच्या काळात सर्वांच्याच घरी गोड आणि फराळाचे पदार्थ बनवले जातात. चमचमीत पदार्थ बनवण्यासाठी तेलाचा जास्त वापर केला जातो. अशात ऐन सणासुदीच्या काळात खाद्यतेलाच्या किंमतींमध्ये वाढ झाली आहे. धान्याच्या किंमतींनुसार काही तेलांचे दर वाढलेत तर काहींचे दर कमी झालेत. (Latest Marathi News)

ऐन दिवळी दसरा तोंडावर असताना अनेक मध्यमवर्गीयांच्या घरात वापरल्या जाणाऱ्या पाम तेलाच्या किंमतीही वाढल्यात. मोहरी सरकी आणि पामतेलाच्या किंमती वाढल्यात. तर सोयाबीन, शेंगदाणा आणि रिफाईंड ऑइलच्या किंमती कमी झाल्या आहेत. तेलाच्या किंमतीत २५ रुपयांपासून ते अगदी १०० रुपयांपर्यंत दर वाढलेत.

लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार, फराळ आणि विविध प्रकारची मिठाई बनवण्यासाठी तेलाचा जास्तीत जास्त वापर केला जातो. यामध्ये मिठाईच्या दुकानात तसेच अनेक कुटुंबांमध्येही मोहरी, पाम आणि सरकी या तेलाचा जास्त वापर केला जातो. बाजारात वाढलेल्या मागणीमुळे या तेलाच्या किंमत वाढत आहेत.

मोहरीच्या दरांत १०० रुपयांनी वाढ झालीये. शुद्द मोहरीच्या तेलात ४५ रुपयांची वाढ झालीये. कच्च्या पामतेलाच्या किंमती देखील १०० रुपयांनी वाढल्यात. सरकी तेलाच्या किंमची २५ रुपयांनी वाढसल्यात. सोयाबीन दाण्यांच्या तेलाच्या किंमतीत घट झालीये. यामध्ये १०० रुपयांची घट झालीये.

विदेशातून विविध प्रकारच्या खाद्य तेलांची आयात होते. या तेलांच्या तुलनेत शेंगदाण्याचे तेल महाग असल्याने विक्रीला फटका बसतोय. भुईमूग आणि सोयाबीनचे दर पडल्याने तेलाच्या किंमतींवरही याचा परिणाम दिसतोय. यामुळे उत्पादक चिंतेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Pune News: माझ्या बॉयफ्रेंडला एड्स आहे, तरी मी त्याच्याशीच लग्न करणार, पुण्यामध्ये कॉलेजला गेलेली २२ वर्षीय तरुणी बेपत्ता

PM Kisan Yojana : पीएम किसानचा २००० रुपयांचा हप्ता खात्यात येण्याआधी 'हे' नक्की तपासा, अन्यथा अडू शकतो हप्ता

October Heat : ऑक्टोबरच्या उकाड्यामुळे किडनी होते खराब, 'ही' ५ गंभीर लक्षणे दिसताच व्हा सावध!

Mangalsutra Design For Wedding: लग्नात घालण्यासाठी सुंदर मंगळसूत्र, लेटेस्ट 5 पॅटर्न्स पाहून प्रेमात पडाल

SCROLL FOR NEXT