Ladki Bahin Yojana saam tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणीच्या माध्यमातून मिळालेल्या पैशांनी कमवा अजून पैसे, 'हा' साधा सोपा बिझनेस महिलांना करेल मालामाल

Ladki Bahin Yojana money Investment: लाडकी बहिणी योजनेच्या माध्यमातून मिळालेल्या पैशांनी तुम्ही अजून पैसे कमावू शकणार आहात. यासाठी काय करावं लागणार आहे याची माहिती घेऊया.

Surabhi Jayashree Jagdish

लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत २.५ कोटी महिलांनी अर्ज केल्याची माहिती आहे. यापैकी अनेक महिलांनी योजनेचा लाभ देखील घेतला आहे. लाडकी बहिणी योजनेच्या माध्यमातून मिळालेल्या पैशांनी तुम्ही अजून पैसे कमावू शकणार आहात. यासाठी तुम्हाला मिळालेल्या पैशांची योग्य गुंतवणूक करणं गरजेचं आहे. आज आम्ही तुम्हाला अशा एका बिझनेसबाबत माहिती देणार आहोत, ज्या माध्यमातून तुम्ही पैसे कमावू शकता.

अनेक स्त्रिया स्वतःचा व्यवसाय सुरू करत नाहीत कारण त्यांना वाटतं की त्यांना व्यवसाय करताना खूप पैसे गुंतवावे लागतील. मात्र आम्ही तुम्हाला सांगतो की जर तुम्ही व्यवसाय सुरू केला तर तुम्ही कमी पैसे गुंतवून चांगल्या नफ्याचा बिझनेस करू शकता. हा व्यवसाय आहे बटाटा चिप्सचा.

कसा सुरु करायचा हा बिझनेस?

या व्यवसायासाठी आवश्यक साहित्य म्हणजे विविध प्रकारचे बटाटे जसे की सामान्य बटाटे, रताळे इ. सोबत चिप्स बनवण्यासाठी भांडी आणि तेल, मीठ आणि तिखट. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्ही फक्त सामान्य बटाटे वापरू शकता. तुम्ही कोणत्याही दुकानातून योग्य किमतीत बटाटे खरेदी करू शकता यानंतर तुम्हाला चिप्स बनवण्याचे मशीन देखील खरेदी करावं लागेल.

हे मशीन तुम्ही ऑनलाइन देखील खरेदी करू शकता. तुम्ही हा व्यवसाय सुरू कराल तेव्हा तुम्ही फक्त एक लहान आणि स्वस्त मशीन खरेदी करावी लागणार आहे. ज्यावेली तुमच्या चिप्सची मागणी वाढली की तुम्ही मोठं मशीन खरेदी करण्याचा विचार करू शकता.

योग्य स्थान निवडा

तुम्ही योग्य ठिकाण निवडून तुमचा व्यवसाय सुरू करावा. जर तुम्हाला तुमच्या घरी हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्हाला चिप्स बनवायला किती जागा आहे आणि ते कुठे पॅक करायचे आहे याची पूर्ण माहिती घ्यावी लागेल.

तुम्ही बजेट ठरवून या बजेटनुसार तुमची मार्केटिंग स्ट्रॅटेजी बनवाा. तुम्ही तुमच्या राहत्या ठिकाणी जवळपास व्यवसायाची जाहिरात करू शकता. याशिवाय सोशल मीडियाच्या मदतीने तुम्ही तुमच्या व्यवसायाची जाहिरात सहज करू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT