Gold Dhanteras 2023 Saam Tv
बिझनेस

Gold Sale: दिवाळीची जबरदस्त सुरुवात! एका दिवसात झाली 22,000 कोटींची सोनेखरेदी; इलेक्ट्रॉनिक वस्तूंचीही तुफान विक्री

Gold Dhanteras 2023: दिवाळीची जबरदस्त सुरुवात! एका दिवसात झाली 22,000 कोटींची सोनेखरेदी; इलेक्ट्रॉनिक वस्तूंचीही तुफान विक्री

Satish Kengar

Gold Dhanteras 2023:

भारतात सणांचा हंगाम सुरू झाला आहे आणि लोक मोठ्या प्रमाणावर खरेदी करत आहेत. तसेच गेल्या वर्षीचे रेकॉर्डही मोडले जात आहेत. त्यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेला रॉकेटचा वेग आला आहे. धनत्रयोदशीला भारतीयांनी रेकॉर्डब्रेक सोने खरेदी केली आहे.

यात गेल्या वर्षीच्या तुलनेत 10 टक्के वाढ दिसून आली आहे. यावर्षी तब्बल 22,000 कोटी रुपयांची सोनेखरेदी करण्यात आली आहे. एका दिवसात भारताने इतर कोणत्याही देशाच्या जीडीपीपेक्षा जास्त सोने खरेदी केले आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सोने स्वस्त झाल्याने खरेदी वाढली

धनत्रयोदशीला सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. अशातच ज्वेलर्सच्या अपेक्षेपेक्षा जास्त खरेदी येथे भारतात दिसून आली. काल म्हणजेच धनत्रयोदशीच्या दिवशी सोन्याचा भाव 1,500 रुपयांनी कमी राहिला, त्याचा परिणाम मागणीवरही दिसून आला. त्यामुळे सोन्याची मागणी आता 7.7 टक्क्यांनी वाढून 42 टन झाली आहे.  (Latest Marathi News)

इलेक्ट्रॉनिक वस्तूंचीही तुफान विक्री

सोने आणि दागिन्यांसह इलेक्ट्रॉनिक वस्तूंनाही बाजारात मोठी मागणी दिसून आली. यात गेल्या वर्षीच्या तुलनेत 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे. इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशिन, एअर कंडिशनर तसेच टेलिव्हिजन आणि घरगुती उपकरणे यांचा समावेश होता.

अर्थव्यवस्थेला मिळेल मोठी गती

सरकार आणि तज्ज्ञांच्या अपेक्षेप्रमाणेच सुरुवात धनत्रयोदशीच्या दिवसापासून दिसून येत आहे. या सणासुदीच्या काळात भारतीय अर्थव्यवस्थेला वेगळी गती मिळेल, असे दिसते. महागाई अधिक असली तरी, लोक त्यांच्या पारंपारिक सण-उत्सवांवर खूप पैसा खर्च करताना दिसत आहेत. येत्या चार ते पाच दिवस भारतीय अर्थव्यवस्थेसाठी खूप चांगले असतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नसरापूर प्रकरणाचा आज न्यायालयात निकाल

नादाला लागू नका, मी ५ लोकांना ठार केले; संजय पाटलांची उघड धमकी? ठाकरेंच्या खासदाराच्या आरोपाने उडाली खळबळ

कांदापोहेऐवजी अवघ्या ५ मिनिटांत बनवा कुरकुरीत 'पोहा पकोडा', रेसिपी वाचून खायचं मन करेल

India forts : इतिहासातील खजिना! भारताच्या कानाकोपऱ्यात लपलेले ५ किल्ले, आयुष्यात एकदा नक्की पाहा

Belly fat reduction: 10 दिवसात घटवा 5 किलोपर्यंत वजन; डॉक्टरांनी सांगितला खास डाएट प्लान, बेली फॅटही होईल कमी

SCROLL FOR NEXT