DA Hike meta ai
बिझनेस

DA Hike : सरकारी कर्मचाऱ्यांची चांदी! 20% DA वाढ, या महिन्यापासून खात्यात जमा होणार पगार

Government Employees : पश्चिम बंगाल सरकारने दुर्गापूजेआधी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी २० टक्के अतिरिक्त महागाई भत्ता जाहीर केला असून ऑक्टोबरचा पगारही आगाऊ देण्याचा निर्णय घेतल्याने लाखो कर्मचाऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे.

Sakshi Sunil Jadhav

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दुर्गापूजेआधी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. पश्चिम बंगालमध्ये सरकारने ऑक्टोबर २०२६ पासून कर्मचाऱ्यांना २० टक्के अतिरिक्त महागाई भत्ता (Dearness Allowance) देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. यासोबतच दुर्गापूजा सुरू होण्याआधीच ऑक्टोबर महिन्याचा पगार कर्माचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे सणासुदीच्या दिवसांमध्ये लाखो सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.

कोलकातामध्ये पश्चिम बंगाल पोलिस मुख्यालय भवान भवन येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांनी ही घोषणा केली. त्यांनी वित्तमंत्री आणि वित्त सचिवांना ऑक्टोबर महिन्याचा पगार दुर्गापूजेआधीच देण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याच महिन्यापासून २० टक्के जास्त महागाई भत्ता लागू करण्याची प्रोसेसही लवकरात लवकर पुर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.

मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं की, राज्याच्या अर्थसंकल्पात ऑक्टोबरपासून २० टक्के जास्त महागाई भत्ता देण्याची घोषणा याआधीच करण्यात आली होती. आता त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येत असून, दुर्गापूजेच्या काळात कर्मचाऱ्यांना वाढीव डीएसोबत आगाऊ वेतनाचा लाभ मिळणार आहे. यामुळे सणासाठी आवश्यक खरेदी आणि इतर खर्च भागवणे कर्मचाऱ्यांसाठी जास्त सोपं होईल.

सध्या पश्चिम बंगाल सरकारच्या कर्मचाऱ्यांना प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी सॅलरी मिळते. मात्र यंगा दुर्गापूजेआधीच ऑक्टोबरचा पगार देण्याचा निर्णय झाल्याने कर्मचाऱ्यांच्या हातात सणाआधीच जास्त निधी उपलब्ध होईल.

यावेळी मुख्यमंत्र्‍यांनी केंद्र सरकार आणि पश्चिम बंगाल सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये ४२ टक्क्यांचा फरक असल्याचंही नमूद केलं. हा फरक एकाच वेळी भरून काढणं शक्य नसेल तर तो टप्प्याटप्प्याने कमी करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचं त्यांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bribe Case : गृहमंत्रालयातील २ अधिकाऱ्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, FCRA प्रकरणात लाच मागितल्याचा आरोप

Maharashtra News Live Update: सचिन वाझेच्या जामिनाला स्थगिती

Cancer : पायात दिसणारी '४ सामान्य लक्षणं असू शकतात कॅन्सरचा संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष

Pitru Paksha : पितृपक्षात दिसणारे 'हे' ५ संकेत मानले जातात शुभ, पितरांचा मिळतो आशीर्वाद अन् अडथळे होतात दूर

Pradip Purnekar Case: प्रदीप पुर्णेकरांच्या हत्येमागं कुणाचा हात? ठाकरेंच्या नेत्याने थेट नाव सांगत केला धक्कादायक खुलासा

SCROLL FOR NEXT