सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी
दिवाळीआधी महागाई भत्ता वाढणार
कर्मचाऱ्यांच्या पगारात आणि पेन्शनमध्ये होणार वाढ
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. दिवाळीआधी केंद्र सरकार कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठी खुशखबर देणार आहे. सरकार सध्या आठवा वेतन आयोग लागू करण्याच्या तयारीत आहे. त्याआधीच दिवाळीत कर्मचाऱ्यांना दिला मिळणार आहे. सरकार लवकरच सातव्या वेतनआ आयोगातील शेवटच्या महागाई भत्त्याची घोषणा करणार आहे. त्यामुळे दिवाळीआधी सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता मिळू शकतो.
दरवर्षी दोनदा महागाई भत्ता वाढतो. आता सरकार जुलै ते डिसेंबर या काळातील महागाई भत्ता वाढवण्याची घोषणा करु शकते. यावेळी महागाई भत्ता ३ टक्के वाढण्याची शक्यता आहे. जर महागाई भत्त्यात ३ टक्क्यांनी वाढ झाली तर एकूण महागाई भत्ता ५८ टक्के होऊ शकतो. सध्या महागाई भत्ता हा ५५ टक्के आहे.यामुळे लाखो कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना फायदा होणार आहे.
वर्षाला दोनदा वाढतो महागाई भत्ता
वर्षभरात दोनवेळा महागाई भत्ता वाढतो. जानेवारी ते जून आणि जुलै ते डिसेंबर या काळात महागाई भत्त्यात वाढ केली जाते. दरम्यान, जुलै ते डिसेंबर या काळातील महागाई भत्त्याची घोषणा कधीही होऊ शकते, असं सांगितलं जात आहे. या महागाई भत्त्यात ३ टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे.
पेन्शन वाढणार (Pension Calculation After DA Hike)
महागाई भत्ता हा तुमच्या बेसिक सॅलरीवर दिला जातो. त्यामुळे प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी महागाई भत्ता वेगवेगळा वाढतो. जर तुमची पेन्शन ९००० रुपये असेल तर त्यावर ५५ टक्के महागाई भत्ता म्हणजे ४,९५० रुपये मिळतात. म्हणजे तुम्हाला १३,९५० रुपये पेन्शन मिळते. आता यात वाढ झाली तर महागाई भत्ता ५,२२० रुपये होईल. यामुळे पेन्शन १४,२२० रुपये होणार आहे.
पगारात वाढ
जर तुमची बेसिक सॅलरी १८००० रुपये असेल तर सध्या त्यावर ५५ टक्के महागाई भत्ता मिळतो. म्हणजेच एकूण ९,९०० रुपये मिळणार आहे. यामुळे पगार २७,९०० रुपये मिळणार आहे. दरम्यान, आता महागाई भत्त्यात वाढ झाली तर तुम्हाला १०,४४० रुपये मिळणार आहे. म्हणजेच तुम्हाला २८,४४० रुपये मिळणार आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.