DA Hike Saam Tv
बिझनेस

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! महागाई भत्ता इतक्या टक्क्यांनी वाढणार; महत्त्वाची अपडेट समोर

DA Hike 2026 Update: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. लवकरच कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढू शकतो. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात किंवा एप्रिलच्या सुरुवातीला महागाई भत्ता वाढू शकतो.

Siddhi Hande

केंद्रीय कर्मचाऱ्यंसाठी आनंदाची बातमी

लवकरच महागाई भत्ता वाढणार

पुढच्या आठवड्यात घोषणा होण्याची शक्यता

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आले. केंद्रीय कर्मचाऱ्यांना लवकरच महागाई भत्ता मिळू शकतो. सरकार लवकरच याबाबत घोषणा करु शकते. पुढच्या मंत्रिमंडळ बैठकीत महागाई भत्त्याबाबत घोषणा होऊ शकते. या बैठकीत महागाई भत्त्याच्या निर्णयाला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.

सरकार वर्षभरात दोनदा महागाई भत्त्यात वाढ करते. जानेवारी आणि जून महिन्यात महागाई भत्ता वाढवला जातो. दरम्यान, जानेवारीमधील वाढणारा महागाई भत्त्याबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे. होळी आणि दिवाळीत अशा दोन कालानधीत महागाई भत्त्यात वाढ होते.

२०२५ मध्ये महागाई भत्त्याची घोषणा २८ मार्च रोजी झाली होती. दरम्यान, या वर्षी २०२६ मध्ये महागाई भत्ता मार्च अखेर किंवा एप्रिलच्या सुरुवातीला घोषणा केली जाईल, अशी अधिकाऱ्यांना अपेक्षा आहे. महागाई भत्त्यातील ही वाढ १ जानेवारी २०२६ पासून लागू होईल. कर्मचारी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांना थकबाकी मिळणार आहे.

महागाई भत्ता कितीने वाढणार? (How Much Dearness Allowance Increase)

सध्याचा महागाई भत्ता हा ५८ टक्के आहे. हा मागच्या वर्षी ऑक्टोबर २०२५ चा महागाई भत्ता आहे. AICPI-IW च्या आकडेवारीनुसार, या महागाई भत्त्यात २ ते ३ टक्क्यांची वाढ केली जाईल. म्हणजेच कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ६० किंवा ६१ टक्के होऊ शकतो.

पगारावर परिणाम (DA Hike)

जर तुमची बेसिक सॅलरी १८००० रुपये असेल तर २ टक्क्यांनी महागाई भत्ता वाढला तर २८,८०० रुपये मिळू शकतात. जर ३ टक्क्यांनी वाढला तर २८,९८० रुपये मिळू शकतात. ज्यांचा पगार २९,२०० रुपये आहे, त्यांना महागाई भत्त्यासहीत ४७,०१२ रुपये मिळू शकतात.

महागाई भत्ता जानेवारीत लागू व्हायला हवा होता. मात्र, महागाई भत्त्याची घोषणा होण्यास उशिर झाला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना २ ते ३ महिन्यांची थकबाकी मिळू शकते. हा महागाई भत्ता महत्त्वाचा असणार आहे कारण सातवा वेतन आयोग संपल्यानंतर हा पहिलाच महागाई भत्ता असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2026 injury update: IPL सुरू होण्याआधीच मोठा धक्का, स्टार खेळाडू दुखापतीमुळे बाहेर पडण्याच्या मार्गावर

Maharashtra Live News Update : नागपुरात वीजकेंद्रांना ड्रोन हल्ल्याची धमकी, प्रशासनात खळबळ

मोठी बातमी: यंदा शिया मुस्लिम समाज ईद साजरी करणार नाही! नेमकं कारण काय?

पाडव्याआधी सोनं झालं स्वस्त, तोळ्यामागे इतक्या रूपयांनी घसरलं, वाचा 22k, 24k गोल्डचे दर

मुंबई लोकलमध्ये महिलेचा अश्लील डान्स, पुरुषाला ही मारहाण; व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT