Petrol Diesel Price Saam Tv
बिझनेस

Petrol Diesel Price (5th August) : कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ, महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल महागलं? जाणून घ्या आजचे दर...

Petrol Diesel Price Today 5th August 2023: आज कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाल्याने महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल महागलं आहे का हा प्रश्न अनेकांना पडला असेल.

कोमल दामुद्रे

Petrol Diesel Price in Maharashtra (Marathi): पेट्रोल डिझेलच्या किमती या आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमतीवर अवलंबून असतात. गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत चढ उतार पाहायला मिळत आहे.

काल गुरुवारी कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण झाली होती परंतु,पेट्रोल-डिझेलचे भाव हे जैसे थेच होते. परिणामी आज कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाल्याने महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल महागलं आहे का हा प्रश्न अनेकांना पडला असेल.

डब्ल्यूटीआय क्रूड १.२७ डॉलर्सने वाढून प्रति बॅरल ८२.८२ डॉलर्सवर विकले जात आहे. त्याच वेळी, ब्रेंट क्रूड १.१० डॉलर्सच्या वाढीसह प्रति बॅरल ८६.२४ डॉलर्सवर व्यापार करत आहे. देशातील  ऑइल (Oil) विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले आहेत. जाणून घेऊया ४ महानगरातील  पेट्रोल (Petrol) डिझेलचे आजचे दर

1. देशातील महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

  • नवी दिल्लीत पेट्रोल ९६.७२ रुपये प्रति लिटर, डिझेल ८९.६२ रुपये प्रति लिटर

  • कोलकाता पेट्रोल 106.03 रुपये, डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर

  • मुंबईत (Mumbai)  पेट्रोल 106.31 रुपये, डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

  • चेन्नईत पेट्रोल 102.63 रुपये, डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर

2. शहरानुसार किंमत कशी तपासायची-

भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज तेल कंपन्या ठरवतात. शहरे आणि राज्यानुसार या किमती निश्चित केल्या जातात. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला तुमच्या शहराची नवीनतम किंमत जाणून घ्यायची असेल, तर तुम्ही एसएमएसद्वारेच तपासू शकता. जर तुम्ही इंडियन ऑइलचे ग्राहक असाल तर इंधनाचे दर जाणून घेण्यासाठी RSP<deलर कोड> लिहा आणि ९२२४९९२२४९ वर मेसेज पाठवा. तर, BPCL ग्राहकांना डीलर कोड> 9223112222 नंबरवर पाठवावा लागेल आणि HPCL ग्राहकांना HPPRICE <डीलर कोड> 9222201122 क्रमांकावर पाठवावा लागेल. यानंतर, काही मिनिटांत कंपनी तुम्हाला शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर पाठवेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: माधुरी हत्तीनी गुजरातमधील वनतारामधून कोल्हापूरच्या दिशेने रवाना

Nanded Accident: नांदेडमध्ये ट्रक - व्हॅनचा भीषण अपघात; 6 जण जागीच ठार, ट्रकचालक केबिनमध्ये अडकला

मनोज जरांगेंच्या आंदोलनाला मोठं यश! १८ हजार २७६ कुणबी जात प्रमाणपत्रांचे वितरण

Special 26 च्या धर्तीवर बनावट आयकर छापा; 1 कोटींच्या खंडणी प्रकरणात 10 जणांना अटक

Skincare Tips : चेहरा सतत निस्तेज दिसतोय? स्किन केअर रुटीनमध्ये या सवयींचा समावेश

SCROLL FOR NEXT