Gold jewellery showcased in a showroom as new hallmarking rules aim to ensure purity and transparency. saam tv
बिझनेस

सरकार सोने खरेदीचे नियम बदलणार; ग्राहकांच्या संरक्षणासाठी आणणार नवा प्लॅन

Gold Buying Rules: सरकार सोन्याच्या दागिन्यांसाठी HUID (युनिक आयडेंटिफिकेशन नंबर) अनिवार्य करण्याचा विचार करत आहे. बनावट दागिन्यांपासून संरक्षण मिळेल, पारदर्शकता वाढेल.

Bharat Jadhav

केंद्र सरकार आता सोन्याच्या दागिन्यांची शुद्धता आणि पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी हॉलमार्किंगचे नियम आणखी कडक करण्याच्या तयारीत आहे. यानुसार प्रत्येक वस्तूसाठी एक विशिष्ट ओळख क्रमांक (HUID) वापरणे अनिवार्य केले जाईल. याचा उद्देश बनावट मालाला आळा घालणे आणि ओळख अधिक स्पष्ट करणे हा आहे.

ओळख क्रमांक पुन्हा वापरता येणार नाही

मिंटच्या एका अहवालात सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, नवीन प्रणालीनुसार, दागिन्यांच्या प्रत्येक तुकड्याला त्याच्या डिझाइन, आकार आणि इतर वैशिष्ट्यांच्या आधारावर एक विशिष्ट ओळख क्रमांक दिला जाईल. दागिना दिसायला अगदी सारखा असला तरीही, हा क्रमांक कोणत्याही परिस्थितीत पुन्हा वापरता येणार नाही.

तसेच एकदा दागिना वितळवून टाकल्यावर, त्याला दिलेला अद्वितीय ओळख क्रमांक इतर कोणत्याही उत्पादनासाठी पुन्हा वापरता येणार नाही. यामुळे प्रमाणपत्राची बनावटगिरी किंवा गैरवापराला आळा बसेल. तसेच, यामुळे ग्राहकांचा विश्वास दृढ होईल आणि बाजारपेठेतील पारदर्शकता वाढेल.

हा निर्णय का घेतला जात आहे?

विशिष्ट हॉलमार्क आयडी आणि शुद्धता पातळीसह खरेदी केलेल्या दागिन्यांची शुद्धता नंतर वेगळी आढळून येत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत, त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. एकाच युनिक आयडीचा वापर विविध कामांसाठी केला जात असल्याचे उघड झाले आहे. मात्र, एकूण तक्रारींची संख्या जाहीर करण्यात आलेली नाही.

उद्योग क्षेत्रातून पाठिंबा

आदित्य बिर्ला ज्वेलरीच्या मालकीची कंपनी असलेल्या इंद्रियाचे सीईओ संदीप कोहली म्हणाले की, हा उपक्रम कॉर्पोरेट ज्वेलर्सच्या भागीदारीत सुरू केला जात आहे. यात हळूहळू संपूर्ण ज्वेलरी इकोसिस्टममध्ये त्याचा विस्तार केला जाईल. या पद्धतीमुळे थर्ड पर्टीकडून आमच्या उत्पादनाच्या HUID क्रमांकांची नक्कल होण्याचा किंवा गैरवापर होण्याचा धोका पूर्णपणे कमी होईल. हॉलमार्क चिन्हांच्या प्रतिमा त्यांच्या प्लॅटफॉर्मवर अपलोड केल्या जातील. यानंतर कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) मदतीने भविष्यात बनावट किंवा खोट्या चिन्हांची ओळख पटवणे शक्य होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीच्या 40 फूट उंच होर्डिंग चे लोकार्पण

Railway Recruitment: रेल्वेत सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; ६५६५ पदांसाठी होणार भरती; रेल्वे मंत्रालयाने दिली मंजुरी

हृदयद्रावक! दिंडोरीमध्ये कार विहिरीत कोसळून एकाच कुटुंबातील 9 जणांचा मृत्यू; मृतांची नावे आली समोर

Gold Price Today: सराफा बाजार उघडताच सोन्याच्या दरात मोठा बदल, वाचा २२ अन् २४ कॅरेटचे आजचे दर

Namo Shetakri Yojana: शेतकऱ्यांनो नमो शेतकरी योजनेचे ₹२००० मिळाले का? अशा पद्धतीने चेक करा स्टेट्स

SCROLL FOR NEXT