केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी सप्टेंबरचा पगार 25 सप्टेंबरला आगाऊ देण्याचे निर्देश
केंद्रीय सरकारी पेन्शनधारकांनाही सप्टेंबरची पेन्शन आगाऊ मिळणार
बँकिंग व्यवहारांवर संभाव्य परिणाम टाळण्यासाठी सरकारने आगाऊ वेतन व पेन्शन वितरणाची व्यवस्था केलीय.
केंद्र सरकारनं केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगाराबाबत एक मोठा निर्णय घेतलाय. सरकार कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात ३० तारखेआधीच पगार जमा करणार आहे. इतकेच नाही तर पेन्शनधारकांनाही त्यांची पेन्शन उद्याच मिळणार आहे. एरव्ही नोकरदारांना महिन्याच्या अखेरीस पगार मिळत असतो. परंतु सरकारनं पाच दिवसाआधीच पगाराची राशी पाच दिवसाआधी का जमा करण्याचे आदेश दिलेत असा प्रश्न अनेकांना पडलाय.
त्यामागील कारण म्हणजे, देशभरातील बँक कर्मचारी संपावर जाणार आहेत. त्यामुळे नोकरदारांचा पगार अडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारनं हा निर्णय घेतलाय. देशभरातील सरकारी बँक कर्मचारी २८ ते ३० सप्टेंबर या तारखांदरम्यान संपावर जाणार आहेत.
अर्थ मंत्रालयाच्या खर्च विभागाने जारी केलेल्या आदेशानुसार यंदा केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना २५ सप्टेंबर २०२६ रोजी पगार मिळेल. मुळात हा पगार सप्टेंबर महिन्याचा पूर्ण वेतन असणार आहे. पगाराच्या अंतिम रकमेत कोणतीही कपात करण्यात येणार नाही. देशभरातील केंद्र सरकारी कर्मचारी, सुरक्षा व्यवस्था तसेच टपाल विभागात कार्यरत कर्मचारी, दूरसंचार तसेच औद्योगिक आस्थापनांतील कर्मचारी या सर्व कर्मचाऱ्यांचे वेतन 25 तारखेला होणार आहे.
कर्मचाऱ्यांना २५ तारखेला मिळणारा पगार आगाऊ स्वरूपात येणार आहे. पगाराच्या अंतिम रकमेत कोणतीही कपात केली जाणार नाही. परंतु महिन्याच्या शेवटी अंतिम हिशोबात काही तफावत आढळल्यास याचा थेट परिणाम ऑक्टोबर महिन्याच्या पगारावर होऊ शकतो. म्हणजेच जर एखाद्या कर्मचाऱ्याचा मासिक पगार ५०,००० हजार इतका आहे.
सरकारच्या आदेशानुसार येत्या २५ सप्टेंबर रोजी कर्मचाऱ्यांना अंतिम वेतन रकमेत कोणतीही कपात न करता म्हणजेच पूर्ण पगाराची रक्कम ५०,००० रुपये मिळेल. परंतु जर महिन्याच्या अंतिम हिशोबात कर्मचाऱ्याची देय रक्कम फक्त ४९५०० रुपये असल्याचे निष्कर्षणास आले तर अशा वेळी देण्यात आलेली अतिरिक्त ५०० रक्कम पुढील महिन्याच्या पगारातून कापण्यात येईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.