Business Idea In Marathi  Saam Tv
बिझनेस

Business Idea In Marathi : महिलांनो, ख्रिसमस आणि नवीन वर्षात सुरु करा हा व्यवसाय; फक्त ८००० रुपयांच्या गुंतवणुकीत कमवाल बक्कळ पैसा

How To Start Business : जर तुम्हालाही व्यवसाय करायचा असेल तर आम्ही तुम्हाला असे काही व्यवसाय सांगणार आहोत ज्यामुळे तुम्हाला बक्कळ पैसा मिळू शकतो. सणासुदीच्या काळात या व्यवसायाला विशेष मागणी असते. ज्यामुळे तुम्हाला अधिक प्रमाणात पैसे मिळतील. तुम्ही ख्रिसमस किंवा नवीन वर्षात हा व्यवसाय सुरु करु शकता.

कोमल दामुद्रे

New Year Business Idea :

वाढत्या महागाईला पाहाता हल्ली प्रत्येकाला अधिक पैसे मिळावे ही इच्छा असते. सध्याच्या युगात साइड इनकम असणे गरजेचे आहे. बऱ्याच वेळा बहुतेकांना नोकरी सोडून स्वत:चा व्यवसाय करण्याची इच्छा असते. परंतु, पुरेशा प्रमाणात भांडवल नसल्यामुळे व्यवसाय करता येत नाही.

जर तुम्हालाही व्यवसाय करायचा असेल तर आम्ही तुम्हाला असे काही व्यवसाय सांगणार आहोत ज्यामुळे तुम्हाला बक्कळ पैसा मिळू शकतो. सणासुदीच्या काळात या व्यवसायाला विशेष मागणी असते. ज्यामुळे तुम्हाला अधिक प्रमाणात पैसे मिळतील. तुम्ही ख्रिसमस किंवा नवीन वर्षात हा व्यवसाय सुरु करु शकता.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

हा व्यवसाय घरी बसून देखील तुम्ही सुरु करु शकता. गिफ्ट (Gift) बास्केट हा व्यवसाय सध्या ट्रेंडमध्ये आहे. जर तुम्हाला डेकोरेशनचे काम आवडत असेल तर तुम्ही यातून चांगले उत्पन्न मिळवू शकता. बाजारात (Market) गिफ्ट बास्केटची मागणी दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे. हे गिफ्ट प्रामुख्याने वाढदिवस किंवा खास प्रसंगी देण्यासाठी मोठ्या प्रमाणात विकत घेतले जाते.

गिफ्ट बास्केट व्यवसायात विविध प्रकारच्या भेटवस्तू देण्यासाठी टोपली बनवली जाते. ज्यामध्ये गिफ्ट चांगले पॅक करुन दिले जाते. ही टोपली तुम्ही घरी बनवू शकता. वेगवेगळ्या प्रकारे आणि वेगवेगळ्या किंमतीमध्ये (Price) ते विकता येऊ शकते. सध्या गिफ्ट पॅकिंगच्या क्षेत्रात मोठे बदल झालेले पाहायला मिळत आहे. गिफ्ट बास्केट व्यवसाय तुम्हाला कमी गुंतवणूक करावी लागेल. यासाठी तुम्हाला ५००० ते ८००० रुपयांपासून सुरुवात करु शकता.

1. मार्केटिंग कसे कराल?

या व्यवसायाची मार्केटिंग करण्यासाठी तुम्हाला गिफ्ट बॉक्सचा सॅमपल पीस बाजारात दाखवावा लागेल. तसेच तुम्ही ऑनलाइन वेबसाइटद्वारे देखील हा व्यवसाय करु शकता. पहिल्यांदा किमत कमी ठेवून बिझनेसमध्ये नाव कमावू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी; गर्दी मराठी भाषेवरच्या अन्यायाविरोधातील, वरळीतल्या ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची

8 Hour Sleep: शरीराला ८ तासाच्या झोपेची आवश्यकता का आहे? वाचा महत्वाचे कारण

SCROLL FOR NEXT