RBI Bank Finance Company News  AI Image
बिझनेस

RBI Bank : RBI चा फायनान्स कंपन्यांना मोठा दणका; ६३ कंपन्यांचे परवाने रद्द

RBI Bank Finance Company Update News : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा ६३ फायनान्स कंपन्यांचे रजिस्ट्रेशन रद्द केले. ४९ कंपन्यांचे परवाने रद्द, तर १४ कंपन्यांनी स्वतःहून नोंदणी परत केली.

Alisha Khedekar

  • RBI ने देशातील एकूण ६३ फायनान्स कंपन्यांच्या नोंदणीबाबत कारवाई

  • रिझर्व्ह बँकेने ४९ NBFC कंपन्यांचे रजिस्ट्रेशन रद्द केले

  • यामध्ये १३ NBFC आणि एका हाउसिंग फायनान्स कंपनीचा समावेश आहे

  • कर्ज घेण्यापूर्वी संबंधित फायनान्स कंपनीचे RBI रजिस्ट्रेशन तपासणे आवश्यक

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) देशातील फायनान्स कंपन्यांविरोधात मोठी कारवाई केली आहे. एकाच वेळी तब्बल ६३ नॉन-बँकिंग फायनान्स कंपन्यांचे (NBFC) परवाने रद्द करण्यात आले आहेत. १६ नोव्हेंबर रोजी RBI ने यासंदर्भात अधिकृत नोटीस जारी केली. यामध्ये ४९ कंपन्यांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. तर उर्वरित १४ कंपन्यांनी स्वतःहून आपले रजिस्ट्रेशन परत केले आहे. यामध्ये १३ NBFC आणि एका हाउसिंग फायनान्स कंपनीचा समावेश आहे. RBI ने ही कारवाई १ ऑक्टोबर ते २९ ऑक्टोबर या कालावधीत घेतलेल्या निर्णयांनुसार केली आहे. विशेष म्हणजे, ही संपूर्ण कारवाई रिझर्व्ह बँक कायदा १९३४ अंतर्गत करण्यात आली आहे.

RBI च्या माहितीनुसार, काही कंपन्यांनी स्वतःहून आपले रजिस्ट्रेशन रद्द करण्याची विनंती केली होती. यापैकी सहा कंपन्यांनी NBFC व्यवसाय पूर्णपणे बंद केला होता. तर पाच कंपन्यांना यापुढे अशा प्रकारच्या रजिस्ट्रेशनची गरज नव्हती. याशिवाय तीन कंपन्यांचे विलीनीकरण झाले होते, त्यामुळे त्यांचे रजिस्ट्रेशन रद्द करण्यात आले.

RBI ने स्पष्ट केले आहे की, ज्या कंपन्यांचे रजिस्ट्रेशन रद्द झाले आहे, त्यांना यापुढे NBFC म्हणून व्यवसाय करता येणार नाही. म्हणजेच या कंपन्या NBFC च्या माध्यमातून ग्राहकांना कर्ज देऊ शकणार नाहीत किंवा फायनान्सशी संबंधित व्यवसाय करू शकणार नाहीत.

या कारवाईनंतर ग्राहकांनी कोणत्याही फायनान्स कंपनीकडून कर्ज घेताना आधी तिची माहिती तपासणे गरजेचे आहे. संबंधित कंपनीकडे RBI चे रजिस्ट्रेशन आहे की नाही, याची खात्री करा. केवळ आकर्षक व्याजदर किंवा कमी कागदपत्रांच्या आमिषाला बळी पडू नका. अनोळखी फायनान्स कंपन्यांशी व्यवहार करताना विशेष खबरदारी घ्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

जळगाव जिल्हा बँकेत मोठा उलटफेर, ऐनवेळी भाजपच्या माघारीनं राष्ट्रवादीच्या उमेदवाराची बिनविरोध निवड

Chandrakor Saree Design: लग्नसमारंभात मिळवा रॉयल मराठमोळा लूक! ट्राय करा चंद्रकोर साडीच्या या ७ हटके डिझाइन्स

Maharashtra News Live Update: रायगडच्या माणगावमध्ये घराचा स्लॅब कोसळून दोन कामगार ठार

Government Scheme : सुकन्या समृद्धी योजनेत दरमहा 2,000 जमा केल्याने मिळतील 11 लाखांहून अधिक रुपये; पाहा संपूर्ण गणित

मुलींच्या खात्यात थेट ₹1 लाख 1 हजार! लेक लाडकी योजनेची अर्ज प्रक्रिया सुरू; पात्रता अन् कागदपत्रे पाहा

SCROLL FOR NEXT