LPG, PUC, BANKING & PROPERTY Rules Change today  AI Image
बिझनेस

New Rules India : आजपासून १० नवे बदल, LPG सिलेंडरपासून बँकिंगपर्यंत नियम बदलले; तुमच्यावर काय परिणाम होणार? जाणून घ्या

1st october New Chnages In India Rules : आज म्हणजे १ ऑक्टोबरपासून LPG, PUC, बँकिंग, जन्म-मृत्यू प्रमाणपत्र, मालमत्ता खरेदी, NPS आणि परदेशी व्यापाराशी संबंधित महत्त्वाचे नियम बदलले आहेत.

Alisha Khedekar

  • आज म्हणजेच १ ऑक्टोबरपासून नवे नियम लागू

  • LPG सिलिंडरसह बँकिंगच्या नियमांत बदल

  • व्यवसायिक सिलिंडरच्या दरात ६२ रुपयांनी वाढ

आजपासून म्हणजेच १ ऑक्टोबरपासून सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणारे अनेक महत्त्वाचे बदल झाले आहेत. LPG सिलेंडर, वाहनांचे PUC, बँकिंग, जन्म-मृत्यू प्रमाणपत्र, मालमत्ता खरेदी आणि परदेशी व्यापाराशी संबंधित नियमांमध्ये बदल केले आहेत. या बदलांचा थेट परिणाम नागरिकांच्या खिशावर आणि आर्थिक व्यवहारांवर होऊ शकतो.काय आहेत हे बदल जाणून घेऊया

1. PUC नसल्यास कारवाई

दिल्ली-NCRमध्ये वैध PUC नसलेल्या वाहनांना पेट्रोल-डिझेल देण्यावर निर्बंध. पेट्रोल पंपांवर कॅमेरे आणि वाहन डेटाबेसच्या माध्यमातून PUC तपासले जाणार आहे. तसेच हे नियम मोडल्यास १० हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो.

2. LPG सब्सिडीसाठी बायोमेट्रिक आवश्यक

LPG सब्सिडीचा लाभ घेण्यासाठी आधार बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन आवश्यक असेल. बायोमेट्रिक न केल्यास सिलेंडर मिळेल; मात्र सब्सिडीचा लाभ मिळणार नाही आणि लागू बाजारभाव द्यावा लागू शकतो.

3. बँकांच्या FD नियमांमध्ये पारदर्शकता

तीन कोटी रुपये किंवा त्यापेक्षा अधिक रकमेच्या बल्क डिपॉझिटवरील व्याजदर बँकांना स्पष्टपणे जाहीर करावे लागतील. ही माहिती वेबसाइटवरही अपडेट करावी लागणार आहे.

4. AC, TV, फ्रिज महागला

कच्चा माल, धातू, वाहतूक खर्च आणि रुपयातील चढ-उतारामुळे काही कंपन्या AC, TV, फ्रिज आणि वॉशिंग मशीनच्या किमती वाढल्या आहेत.

5. LPG आणि ATFचे दर बदलणार

ऑइल मार्केटिंग कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी कमर्शियल LPG आणि ATFच्या आज नव्या दरांची घोषणा झाली आहे. LPG कमर्शियल सिलिंडरच्या किमतीत ६२ रुपयांनी वाढले आहेत.

6. जन्म-मृत्यू प्रमाणपत्रासाठी नवे नियम

जन्म-मृत्यू प्रमाणपत्रासाठी २१ दिवसांत नोंदणी केल्यास ती मोफत राहणार आहे. मात्र उशिराने नोंदणी केल्यास अतिरिक्त पडताळणी आणि अधिकाऱ्यांची मंजुरी आवश्यक होईल. दोन वर्षांपेक्षा अधिक विलंब झाल्यास न्यायिक दंडाधिकाऱ्याची परवानगी अनिवार्य असेल.

7. NRIकडून घर-जमीन खरेदी सोपी

NRIकडून मालमत्ता खरेदी करताना निवासी व्यक्ती आणि HUFला TDSसाठी स्वतंत्र TAN घेण्याची गरज राहणार नाही. PAN आधारित रिपोर्टिंगद्वारे प्रक्रिया करता येईल.

8. NPSमध्येही बदल

NPSशी संबंधित नवीन आरोग्यविषयक व्यवस्था आणि Point of Presence (PoP) शुल्कासाठी नवे फ्रेमवर्क लागू होणार आहे.

9. बँकिंग रेकॉर्डसाठी नवा कायदा

Bankers’ Books Evidence Act, 2026 लागू होणार असून इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल बँकिंग रेकॉर्डनाही कायदेशीर चौकटीत स्पष्ट स्थान मिळणार आहे.

10. परदेशी व्यापारासाठी नियम सोपे

FEMA अंतर्गत आयात-निर्यात व्यवहारांतील पेमेंटच्या वेळेबाबत बदल होणार आहेत. बँकांना पेमेंटची मुदत ठरवताना भारतीय आयातदार आणि परदेशी पुरवठादार यांच्यातील कराराच्या अटींचा आधार घेता येईल. त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापार करणाऱ्या व्यवसायांना अधिक लवचिकता मिळू शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sugar Price: मोठी बातमी! साखरेचे भाव १०० पार जाणार? सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना बसणार झटका

EPFO चा मोठा निर्णय! PF Trustsना मिळणार मोठी संधी, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Maharashtra News Live Update: आज उल्हासनगरमध्ये ७ स्वीकृत नगरसेवकांची निवड

Rain Alert: परतीच्या पावासाचा तडाखा, कोकण अन् मध्य महाराष्ट्राला झोडपून काढणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?

LPG Price Today : सणासुदीआधी महागाईचा झटका! LPG सिलिंडरच्या दरात मोठी वाढ, जाणून घ्या तुमच्या शहरातील नवे दर

SCROLL FOR NEXT