Ladli Behna Yojana Madhya pradesh AI Image
बिझनेस

Ladli Behna Yojana : लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! १५०० रुपये महिलांच्या खात्यात जमा; मुख्यमंत्र्यांची घोषणा

Madhya Pradesh Ladli Behna Yojana News : लाडली बहना योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी! मध्य प्रदेश सरकारकडून ४२व्या हप्त्याचे वितरण करण्यात आले असून १ कोटी २४ लाखांहून अधिक महिलांना आर्थिक मदत मिळाली आहे.

Alisha Khedekar

  • मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी लाडली बहना योजनेचा ४२वा हप्ता वितरित केला

  • १ कोटी २४ लाखांहून अधिक पात्र महिलांच्या बँक खात्यांत १,८३१ कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी जमा

  • प्रत्येक पात्र महिलेला १,५०० रुपयांचा आर्थिक लाभ मिळणार

मध्य प्रदेशातील लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री लाडली बहना योजनेचा ४२वा हप्ता महिलांच्या खात्यात वितरित केला आहे . या माध्यमातून राज्यातील १ कोटी २४ लाखांहून अधिक पात्र महिलांच्या बँक खात्यांमध्ये १८३१ कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा करण्यात आली. यामुळे प्रत्येक पात्र महिलेच्या खात्यात आता १ हजार ५०० रुपये जमा होणार आहेत.

शिवपुरी जिल्ह्यातील पिछोर येथे आयोजित महिला संमेलनात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हा निधी वितरित करण्यात आला. यावेळी बोलताना त्यांनी महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी बनवणे हे सरकारचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे सांगितले. महिलांना आर्थिक आधार मिळाल्यास राज्याच्या विकासालाही गती मिळेल, असे त्यांनी नमूद केले. या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी अभियानांतर्गत कार्यरत असलेल्या ५.५ लाखांहून अधिक महिला बचत गटांनाही मोठी मदत दिली. या गटांना कॅश क्रेडिट सुविधेअंतर्गत २०० कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी देण्यात आला.

याशिवाय शिवपुरी जिल्ह्यातील २२१.२२ कोटी रुपयांच्या १२१ विकासकामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन करण्यात आले. यामध्ये पूर्ण झालेल्या ३६ कामांचे उद्घाटन, तर ८५ नवीन कामांचे भूमिपूजन करण्यात आले. दरम्यान, पिछोरला स्वतंत्र जिल्ह्याचा दर्जा देण्याच्या मागणीवरही मुख्यमंत्र्यांनी भाष्य केले. यासाठी सरकारने परिसीमन आयोग स्थापन केला असून, आयोगाच्या शिफारशीनुसार पुढील निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

पिछोर येथे शाळा आणि आधुनिक क्रीडा संकुल उभारण्याची घोषणाही त्यांनी केली. तसेच बमोर्कलान येथे महाविद्यालय, खनियाधाना येथे पोलीस चौकी आणि मोती सागर तलावाच्या सुशोभीकरणासाठी निधी देण्याचे जाहीर केले. महिलांना रोजगार देणाऱ्या उद्योगांना सरकारकडून प्रोत्साहन दिले जात आहे. अशा उद्योगांमध्ये प्रत्येक महिला कर्मचाऱ्यामागे संबंधित नियोक्त्याला दरमहा ५ हजार रुपयांचे अतिरिक्त प्रोत्साहन दिले जात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पाकिस्तानी सौंदर्य प्रसाधनाचा फॉरेन्सिक अहवाल प्राप्त

Pune Land Scam: पुण्यात आणखी एक मोठा जमीन घोटाळा, बनावट सह्या अन् खोटी ओळखपत्रे वापरून शेती हडपली

Raj Thackeray : गोकुळवरून राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल; म्हणाले, पराभव मान्य करायला हवा, पण...

Hair Care Tips : केस धुताना तुम्हीही या ७ चुका करता का? आताच बदला सवय अन्यथा..

Kitchen Vastu Tips: किचनमध्ये मसाल्यांचे डबे कोणत्या दिशेला ठेवावेत? वास्तूशास्त्रात सांगण्यात आले आहेत योग्य नियम

SCROLL FOR NEXT