mukhyamantri mahila rojgar yojana Saam tv
बिझनेस

Mukhyamantri Mahila Rojgar Yojana : 1.81 कोटी महिलांच्या बँक खात्यात कधी पैसे येणार? सरकारने दिली महत्त्वाची अपडेट

Mukhyamantri Mahila Rojgar Yojana update : मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेची महत्वाची माहिती हाती आली आहे. या योजनेबाबत मंत्र्यांनी महत्वाची माहिती दिली आहे.

Vishal Gangurde

मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेबाबत महत्वाची अपडेट

योजनेची रक्कम पात्र महिलांना मिळणार

सम्राट यांच्या कॅबिनेटमधील मंत्र्यांनी दिली माहिती

मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेबाबत महत्त्वाची अपडेट हाती आली आहे. मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेसाठी २ लाखांसाठी निश्चित करण्यात आले आहेत. ही रक्कम चार हप्त्यात दिली जाणार आहे. ही रक्कम पात्र महिलांना मिळणार आहे. या योजनेअंतर्गत बिहारमधील महिलांना सुरुवातीला १० हजार रूपयांचा देण्यात आला होता. त्यानंतर आता या योजनेच्या दुसर्‍या हप्त्याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीआधी महिलांच्या बँक खात्यात १०-१० हजार रुपये पाठण्यात आले होते. त्यावेळी पात्र महिलांना दोन लाख रुपयांची मदत करणार असल्याचे जाहीर केले होते. ही योजना बिहारमध्ये गेमचेंजर ठरली होती. बिहारमधील महिलांनी एनडीएला भरभरून मतदान केलं होतं.

आता बिहारमध्ये कॅबिनेटचा विस्तार होताच जनसंपर्क विभाग आणि ग्रामीण विकास विभागाचे मंत्री श्रवण कुमार यांनी खुशखबर दिली आहे. मंत्री श्रवण कुमार यांनी योजनेचा दुसरा हप्ता लवकरच खात्यात जमा होणार असल्याचे आश्वासन दिलं. मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेअंतर्गत पात्र महिलांना २ लाखांपर्यंत आर्थिक मदत केली जाणार आहे. चार टप्प्यात पैशांचे वाटप होईल. २० हजारांचा पहिला हप्ता, त्यानंतर दुसरा ४० हजारांचा हप्ता, तिसरा हप्ता ८० हजार आणि चौथा हप्ता ६० हजारांचा असेल.

बिहार सरकारने या योजनेअंतर्गत सुरुवातीला १० हजार रुपये घेऊन रोजगार सुरू केला. त्याच महिलांना पुढील हप्ता मिळणार आहे. याआधीही सरकारने योजनेअंतर्गत निवड केली आहे. अतिरिक्त निधीच्या स्वरुपात सरकारने मदतीचा हात पुढे केलाय. ज्या महिलांनी जीविका कार्यालयात अर्ज केलाय, त्यांना मंजुरी मिळाली आहे. त्यांनाच ही आर्थिक मदत मिळणार असल्याचे सांगण्यात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अस्सल गावरान स्टाईल चिवळीची भाजी कधी खाल्लीये का? एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा| Chivalichi Bhaji Recipe

Pune : पुणेकरांना मोठा दिलासा! पाण्याची चिंता मिटली, ८ दिवसांत धरणातील पाणीसाठा वाढला; वाचा ताजी आकडेवारी

Thick Curd: पावसाळ्यात घरच्या घरी घट्ट दही कसं लावावं?

Maharashtra News Live Update: भूकंपाच्या धक्क्याने नांदेड हादरलं, मध्यरात्री एक वाजून 37 मिनिटांनी भूकंपाचा पहिला धक्का

Pune Rain: पुण्यात पावसाचा कहर! ओढ्याला आलेल्या पूरात शेतकरी वाहून गेला, शेतामध्ये गेले असता भयंकर घडलं

SCROLL FOR NEXT