बिझनेस

Bank Holidays: ऐकलं का! बँकिंग कामे लवकर आवरून घ्या; 3 दिवस बँका राहणार बंद, जाणून घ्या सर्व शेड्युल

Bank Holidays for Many Days: जर तुम्ही बँकेशी संबंधित काही काम पूर्ण करण्याचा विचार करत असाल, तर जूनच्या सुरुवातीपूर्वी बँका कधी बंद असतील हे आधीच जाणून घ्या.

Bharat Jadhav

जून महिना अवघ्या काही दिवसांत सुरू होईल. याआध जर तुमचे बँकेशी संबंधित कोणतेही काम बाकी असतील तर ते लवकर पूर्ण करून घ्या. जून महिन्याच्या सुरुवातीला वेगवेगळ्या राज्यांमध्ये बँकांना सुट्ट्या असतील. एकाच ठिकाणी बँका सलग ३ दिवस बंद राहतील. बँकेत जाऊन काही काम करून घेणे तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहे, तर चला जाणून घेऊया. सलग ३ दिवस बँका कुठे बंद राहतील? जूनपूर्वी बँका कुठे आणि केव्हा बंद राहतील? हे जाणून घ्या.

बँका सलग ३ दिवस बंद राहतील

भारतीय स्टेट बँक प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला बँकेच्या हॉलिडे लिस्ट जाहीर केलं जातं. मे महिन्याची हॉलिडे लिस्ट जाहीर आधीच झाली होती. उद्या, परवाच्या दिवशी बँकेशी संबंधित काही काम करण्याचा विचार करत असाल तर २४ मे, २५ मे आणि २६ मे रोजी बँका बंद राहतील. सर्व राज्यांमध्ये सलग तीन दिवस बँका बंद होणार नाहीत. २४ आणि २५ मे रोजी देशभरातील सर्व बँका बंद राहतील, परंतु त्रिपुरामध्ये २६ मे रोजी बँकांना सुट्टी असेल.

सोमवार, २६ मे रोजी त्रिपुरामध्ये बँका बंद राहतील. काझी नजरुल इस्लाम यांच्या जयंतीनिमित्त येथे सरकारी सुट्टी आहे. यामुळे राज्यातील सर्व बँका बंद राहतील. तर, २४ मे रोजी चौथा शनिवार आणि २५ मे रोजी रविवार असल्याने देशभरातील बँका बंद राहतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India Fort : किल्ल्यातच वसलंय अर्ध शहर, जगातील 'हे' अनोखं ऐतिहासिक ठिकाण पाहिलंय का?

Maharashtra News Live Update: नागपूरमध्ये ट्रॅक्टर पुलावरून नदीत कोसळला, एकाचा जागीच मृत्यू

Online Rent Agreement : घरमालक आणि भाडेकरूंनी ऑनलाइन भाडेकरार कसा करावा? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Farmer Loan Waiver Scheme: मयत शेतकऱ्यांच्या वारसांनाही कर्जमुक्तीचा लाभ मिळणार, सरकारचा मोठा निर्णय

पांढरे कपडे पुन्हा नव्यासारखे चमकवा! पिवळे डाग घालवण्यासाठी ‘या’ ५ स्मार्ट ट्रिक्स वापरा

SCROLL FOR NEXT