Apple Laptop Saam TV
बिझनेस

Laptop offer: जबरदस्त ऑफर ! Apple चा लॅपटॉप स्वस्तात घेण्याची संधी; खरेदी किंमतीवर मिळतेय मोठी सूट

Apple Laptop: जर तुम्ही नवीन लॅपटॉप घेण्याचा विचारात आहात का ? तर ॲपलने तुमच्यासाठी एक अप्रतिम ऑफर आणलीय. हो, MacBook Air M2 वर मोठी सूट देण्यात येत आहे.

Bharat Jadhav

Apple MacBook Air M2 Discount Offer:

Apple ने M3 चिपसेटसह ने आपला नवीन लॅपटॉप लॉन्च केला, त्यानंतर कंपनीने १३ इंच मॅकबुक एअर एम2 मॉडेलच्या किंमती कमी केल्या आहेत. २०२२ MacBook Airमॉडेल सध्या Apple च्या अधिकृत वेबसाइटवर २०,००० रुपयांच्या सवलतीत उपलब्ध आहे. लॅपटॉपची किंमत आता ९९,९०० रुपये झालीय. ही किंमत वास्तविक किंमत १, १९,९०० रुपयांपेक्षा कमी आहे. जर तुम्ही विद्यार्थी असाल तर तुम्ही हा लॅपटॉप स्टुडंट डिस्काउंट ऑफरसह रु. ८९,९०० पेक्षा कमी किंमतीत खरेदी करू शकता.(Latest News)

नवीन MacBook साठी, M3 सह १३ -इंच मॅकबुक एअरची किंमत १,१४,९०० रुपये आहे. तर विद्यार्थ्यांसाठी, त्याची किंमत १,०४,९०० रुपये आहे. ॲपलच्या ऑनलाइन आणि ऑफलाइन स्टोअरमधून ग्राहक ४ मार्चपासून M3 सह नवीन MacBook Air ऑर्डर करू शकतात. तर ८ मार्चपासून नवीन मॅकबुक ऍपल स्टोअरवर खरेदीसाठी उपलब्ध होईल.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

MacBook Air M2 खरेदी करणे योग्य आहे का?

तुम्ही हा लॅपटॉप २०२४ मध्ये खरेदी करू शकता कारण विद्यार्थ्यांच्या सवलतीसह, तुम्ही ते अगदी स्वस्तात खरेदी करू शकता. लॅपटॉप सेगमेंटमध्ये ही डील खूप चांगली आहे. यामुळे या सवलतीचा फायदा घेत लॅपटॉप खरेदी केला पाहिजे. जर तुम्ही अधिकचे पैसे खर्च करू शकतात. ते लोक अजून काही हजार रुपये खर्च करू शकतात. एम३ चिप असलेले नवीन एअर मॉडेल खरेदी करावं. जर तुम्हाला MacBook Air M3 लॅपटॉप विकत घ्यायचा नसेल तर MacBook Air M2 खरेदी करू शकतात. हे ऍपलच्या नवीन आणि चांगल्या M2 प्रोसेसरसह सुसज्ज आहेत. ते हाय-एंड १३-इंच मॅकबुक प्रो २०२२ मॉडेलला देखील सपोर्ट देतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आशिष शेलार यांच्या वोट जिहाद च्या मुद्द्याला मनसेकडून जोरदार उत्तर

QR Code : बनावट क्यूआर कोड कसा ओळखावा? जाणून घ्या

Chanakya Niti: सर्वात जास्त ज्यावर प्रेम करतो तोच घात करतो? चाणक्यांनी सांगितलं गुपित

Forest Department Recruitment: खुशखबर! वनविभागात नोकरीची सुवर्णसंधी; अर्ज कुठे अन् कसा करावा?

Moto G67 Power 5G Launched: अडीच बॅटरी बॅकअप, 4K व्हिडिओ रेकॉर्डिंग, ५० मेगापिक्सेल कॅमेरा; दमदार फीचरवाला Moto चा G67 Power 5G लाँच

SCROLL FOR NEXT