New Rules  Saam tv
बिझनेस

New Rules : गॅस सिलिंडर, UPI आणि बँक...;1 एप्रिलपासून नियम बदलणार, थोडं दुर्लक्ष महागात पडणार, जाणून घ्या महत्त्वाचे बदल

New Rules information :1 एप्रिलपासून नियम बदलणार आहेत. या नियमांकडे दुर्लक्ष केल्यास महागात पडू शकते.

Vishal Gangurde

मुंबई : १ एप्रिलपासून नवं आर्थिक वर्ष सुरु होणार आहे. नव्या आर्थिक वर्षात देशात अनेक बदल होणार आहे. नव्या बदलामुळे सर्वसामानांच्या खिशावर परिणाम होणार आहे. गॅस सिलिंडर, बँक अकाऊंट ट्रांजेक्शनमधील बदल, क्रेडिट कार्डावरील शुल्कात बदल होणार आहे. टोल टॅक्सवरही बदल होण्याची शक्यता आहे.

तेल आणि गॅस वितरण कंपन्यां प्रत्येक महिन्याच्या १ तारखेला एलपीजी सिलिंडर किंमतीत बदल करतात. १ एप्रिल २०२५ रोजी देखील किंमतीत बदल होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी १९ किलोग्रॅमच्या सिलिंडरच्या किंमतीत चढ-उतार पाहायला मिळाला होता. तर घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमती स्थिर होत्या. तर आता १४ किलोच्या सिलिंडरचे दर कमी होण्याची शक्यता आहे.

सीएनजी-एलपीजीचे दर

एलपीजी सिलिंडरच्या किंमतीसहित सीएनजी आणि पीएनजीच्या किंमतीत प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला बदल होतो. त्यामुळे १ एप्रिल रोजी एअर टर्बाइन फ्यूलच्या किंमतीत बदल होण्याची शक्यता आहे. सीएनजीच्या किंमतीत चढ-उतार झाल्यास प्रवासी भाड्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

यूपीआय बंद होणार?

एक एप्रिलपासून यूपीआयशी संबंधित नियमात बदल होणार आहे. ज्या मोबाईल नंबरहून युपीआय अकाऊंट बऱ्याच वेळेपासून वापरले जात नाही. त्यांची यूपीआय सेवा बंद होण्याची शक्यता आहे.

नवीन कर योजना

एक एप्रिलपासून नवीन कर योजना लागू होईल. सरकारने यंदाच्या बजेटमध्ये मध्यमवर्गीयांना दिलासा देण्याची नियमात मोठे बदल केले आहेत. आयकर कायदा १९६१ च्या जागी नवीन आयकर बिल आणलं जाणार आहे. त्यानुसार १२ लाखांपर्यंतच्या कमाईवर कोणताही कर देण्याची गरज नाही. पगारदारांना ७५००० रुपये स्टँडर्ड डिडक्शनचा फायदा घेता येणार आहे. त्यामुळे १२.७५ लाखापर्यंत पगारावर आयकर नसणार आहे.

क्रेडिट कार्डच्या नियमात बदल

रिवॉर्ड आणि अन्य सुविधांमुळे बदल होणार आहे. SBI Simply Click कार्ड आणि स्वीगी रिवॉर्ड ५ पटीने घट करून अर्धा होणार आहे. एअर इंडिया सिग्नेचर कार्डच्या पॉइंट्स ३० घट होऊन १० केले जाणार आहे. IDFC First बँक त्यांचे क्लब विस्तारा माइलस्टोनचे फायदे बंद करणार आहे.

खात्यातील कमीत कमी शिल्लक रक्कम

एक एप्रिलपासून SBI, PNB आणि अन्य बचत खात्यात कमीत कमी शिल्लक रक्कमेच्या नियमात बदल केले जाणार आहे. नव्या नियमाअंतर्गत वेगवेगळ्या क्षेत्रासाठी नवीन कमीत शिल्लक रक्कम मर्यादा निश्चित केली जाणार आहे. यासाठी खातेदारांना बँकेचे नियम लक्षात घेऊन शिल्लक रक्कम खात्यात ठेवावी लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pakistan Hockey Team : पाकिस्तानी हॉकी संघ भारतात येणार; आशिया कप खेळण्याची मंजुरी | VIDEO

Dora Cake Recipe: लहान मुलांच्या आवडीचा डोरा केक आता बनवा घरी, सोपी आहे रेसिपी

Monsoon AC temperature: पावसाळ्याच्या दिवसात एसीचं टेंपरेचर किती ठेवलं पाहिजे?

Ghushmeshwar Waterfall : त्र्यंबकेश्वरपासून काही मिनिटांच्या अंतरावर वसलेले हे Hidden धबधबे आयुष्यात एकदातरी पाहा

Pune Traffic Diversions News : पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! शहरातील वाहतुकीत आज मोठा बदल; पर्यायी मार्ग कोणते?

SCROLL FOR NEXT