Amazon Founder Jeff Bezos Saam Digital
बिझनेस

Amazon Founder Jeff Bezos : Jeff Bezos होणार मालामाल; एका झटक्यात जमा होणार ५ अरब डॉलर्स, कसं ते जाणून घ्या?

Jeff Bezos : जेफ बेजोस या महिन्यात 2.5 कोटी शेअर्सची विक्री करणार आहेत. या शेअरमधून ५ अरब डॉलर म्हणजेच ४१,७४८ कोंटीची कमाई होणार आहे. जेफ बेजोस जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत.

Sandeep Gawade

जगातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि अमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस यांच्या उत्पन्नात आणखी वाढ होणार आहे. एका क्षणात त्यांच्या अकाऊंटमध्ये ४१००० कोटी रुपये जमा होणार आहेत. इतकी मोठी रक्कम एका क्षणात कशी जमा होणार असा प्रश्न पडला असेल? पण या महिन्यात ते शक्य होणार आहे.

जेफ बेजोस या महिन्यात 2.5 कोटी शेअर्सची विक्री करणार आहेत. या शेअरमधून ५ अरब डॉलर म्हणजेच ४१,७४८ कोंटीची कमाई होणार आहे. त्यात अमेझॉनचे शेअर सध्या विक्रमी उच्चांकावर आहेत. या शेअर विक्रीची माहिती Amazon ने अमेरिकन स्टॉक एक्सचेंजला दिली आहे. फेब्रुवारीमध्ये त्यांनी ९ दिवसांत ८.४ अब्ज डॉलर्सच्या शेअर्सची विक्री केली होती. 2021 नंतर जेफ बेझोस यांनी शेअर्स विकण्याची ही पहिलीच वेळ होती.

2.5 कोटी शेअर्सची विक्री केल्यानंतर शेअर्समधून कमाईचा आकडा १३.५ अरब डॉलर्सवर पोहचणार आहे. त्यांच्याकडे 9.12 कोटी शेअर्स शिल्लक राहतील. हे शेअर्स अमेझॉनच्या त्यांच्या हिस्सेदारीतील ८.८ टक्क्यांइतकी असेल. जेफ बेजोस सध्या २२१.६ अरब डॉलर्ससह जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. ॲमेझॉन व्यतिरिक्त त्यांच्याकडे वॉशिंग्टन पोस्ट आणि स्पेस कंपनी ब्लू ओरिजिनची मालकी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT