DA Hike Saam Tv
बिझनेस

DA Hike : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, उद्या महागाई भत्ता वाढीची घोषणा? दिवाळी बोनसही मिळणार!

DA Hike Announcement: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ होणार आहे. याची घोषणा बुधवारी करण्याची शक्यता आहे.

Siddhi Hande

केंद्रिय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्रिय कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या महाभाई भत्त्यात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बुधवारी याबाबत घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जाते. या वेळी महागाई भत्त्यात ३ ते ४ टक्के वाढ होण्याची शक्यता आहे.

सरकार महागाई भत्त ५४ टक्के करु शकतो. सध्या महागाई भत्ता ५० टक्के दिला जातो. त्यात वाढ केली जाणार आहे. महागाई भत्त्यातील ही वाढ १ जानेवारी ते १ ऑक्टोबर या कालावधीत लागू होणार आहे. त्याचसोबत दिवाळी बोनस ऑक्टोबर महिन्याच्या पगारात येणार आहे. (DA Hike Announcement)

कर्मचारी आणि पेन्शन धारकांना हा महागाई भत्ता मिळणार आहे. ऑल इंडिया कंज्युमर प्राइस इंडेक्सवर आधारित महागाई भत्ता असतो. जर महागाई भत्त्यात ३ टक्क्यांनी वाढ झाली तर ज्यांची बेसिक सॅलरी १८,००० रुपये आहे. त्यांनी महागाई भत्ता ९००० रुपयांत वाढ करुन ९,५४० रुपये मिळणार आहे. जर महागाई भत्त्यात ४ टक्क्यांनी वाढ झाली तर ९,७२० रुपये मिळू शकतात.

ऑक्टोबर महिन्यात महागाई भत्त्यात वाढ झाली तर सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना दिलासा मिळणार आहे. सणासुदीच्या काळात त्यांना जास्त पैसे मिळणार आहे. देशातील १ कोटी सरकारी कर्मचाऱ्यांना हा महागाई भत्ता मिळणार आहे. (DA Hike)

सरकारचे सध्या लक्ष महागाई भत्ता वाढवणे आणि महागाई नियंत्रित करण्यावर आहे. परंतु सरकारने आठवा वेतन आयोग लागू करण्यावरदेखील चर्चा करत आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांची यंदाची दिवाळी आणि दसरा चांगला साजरा होणार असल्याचे दिसत आहे. (8th Pay Commission)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

चिनाब पुलामुळे काश्मीरच्या विकासाला गती; रेल्वे संपर्कातून पर्यटन आणि व्यापाराला चालना

Ladki Bahin Yojana: नवरात्रीनंतर दसराही गेला, लाडक्या बहि‍णींच्या खात्यात १५०० रुपये कधी जमा होणार? वाचा अपटेड

Maharashtra News Live Update: दिवेआगर दुर्घटनेप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल, ८ विद्यार्थ्यांचा झाला होता मृत्यू

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल अन् CNG च्या दरात वाढ, तुमच्या शहरातील आजचे दर किती?

Spicy Food: मसालेदार झणझणीत पदार्थ खाल्ल्यावर शरीरात काय घडतं? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT