Vivo launched cheapest 5G smartphone Vivo G2 Saam Tv
बिझनेस

5000mAh ची बॅटरी, 256GB स्टोरेज; Vivo ने लॉन्च केला सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन, किंमत किती?

Satish Kengar

Vivo launched cheapest 5G smartphone Vivo G2:

आघाडीची मोबाईल उत्पादक कंपनी Vivo ने G-Series मध्ये आपला नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे. कंपनीचे जी-सिरीजचे हे पहिले डिव्हाइस आहे. Vivo G2 हे ब्रँडच्या बजेट पोर्टफोलिओमध्ये एक नवीन एडिशन आहे.

हा स्मार्टफोन 6.56-इंचाच्या LCD स्क्रीनसह येतो. जो 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. यात 8GB पर्यंत रॅम देण्यात आला आहे. तसेच कंपनीने यात अनेक नवीन फीचर्स दिले आहेत. याचबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ... (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कंपनीने यात MediaTek Dimensity 6020 प्रोसेसर दिला आहे. ग्राहकांना यामध्ये 5000mAh बॅटरी मिळणार. कंपनीने सध्या हा डिव्हाइस चीनमध्ये लॉन्च केला आहे. (Latest Marathi News)

Vivo G20 ची किती आहे किंमत?

Vivo चा हा फोन 4GB RAM + 128GB स्टोरेजच्या बेस व्हेरिएंटमध्ये येतो. या व्हेरिएंटची किंमत 1199 युआन (सुमारे 14 हजार रुपये) आहे. तर याच्या 6GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 1499 युआन (अंदाजे 17,500 रुपये) आहे. याचा तिसरा व्हेरिएंट 8GB RAM + 128GB स्टोरेजसह 1599 युआनच्या (अंदाजे 18,700 रुपये) किमतीत येतो.

याचा टॉप व्हेरिएंट 8GB RAM + 256GB स्टोरेजसह 1899 युआन (अंदाजे 22,200 रुपये) मध्ये येतो. कंपनीने हे फक्त स्पेस ब्लॅक कलर व्हेरिएंटमध्ये लॉन्च केले आहे. हा फोन कंपनी भारतात कधी लॉन्च करणार, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

स्पेसिफिकेशन

Vivo G2 ड्युअल सिम सपोर्टसह येतो. हा डिव्हाइस Android 13 वर आधारित Origin OS वर काम करतो. हँडसेट 6.56-इंचाच्या HD+ IPS LCD डिस्प्लेसह येतो. जो 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. डिव्हाइस MediaTek Dimensity 6020 प्रोसेसरवर काम करतो. यात 8GB रॅम आणि 256GB पर्यंत स्टोरेजचा पर्याय आहे. यात 13MP चा कॅमेरा देण्यात आला आहे. याचा फ्रंट कॅमेरा 5MP चा आहे. हा फोन 5G सपोर्टसह येतो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT