Union Budget 2024 Live Updates: Saamtv
Union Budget 2025 Highlights

New Internship Scheme: युवा वर्गाला गिफ्ट! ५ वर्षांत १ कोटी तरुणांना टॉप ५०० कंपन्यांमध्ये इंटर्नशिप, सरकारने जाहीर केली योजना

Union Budget 2024 Live Updates: नव्या एनडीए सरकारचा पहिला अर्थसंकल्प आज सादर होत असून यामध्ये युवकांसाठी सर्वात मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. केंद्र सरकार ४.१ कोटी तरुणांना रोजगारासाठी पाच योजना आणणार आहे.

Gangappa Pujari

दिल्ली, ता. २३ जुलै २०२४

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प आज सादर होत आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या संसदेमध्ये अर्थसंकल्प सादर करत असून सरकारने १ कोटी तरुणांना टॉप ५०० कंपन्यांमध्ये इंटर्नशिप देण्यासंदर्भातील मोठ्या योजनेची घोषणा केली आहे.

नव्या एनडीए सरकारचा पहिला अर्थसंकल्प आज सादर होत असून यामध्ये युवकांसाठी सर्वात मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. केंद्र सरकार ४.१ कोटी तरुणांना रोजगारासाठी पाच योजना आणणार आहे. येत्या ५ वर्षात सरकार २ लाख कोटी रुपये खर्च करणार आहे. सरकार 1 कोटी तरुणांना मोठ्या 500 कंपन्यांमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी देणार आहे. यामध्ये प्रत्येक महिन्याला 6000 रुपयांच्या अतिरिक्त भत्त्यासह 5000 रुपये भत्ता दिला जाणार आहे.

तसेच सर्व क्षेत्रांमध्ये पहिल्यांदा नोकरी मिळवणाऱ्यांना सरकार दोन वर्षांसाठी दरमहा ३०० रुपये अतिरिक्त पीएफ देणार आहे. EPFO मध्ये नोंदणीकृत प्रथमच कर्मचाऱ्यांना 3 हप्त्यांमध्ये एका महिन्याच्या पगाराचे थेट लाभ हस्तांतरण 15,000 रुपयांपर्यंत असेल. युवकांना कौशल्य प्रशिक्षण दिले जाईल. 30 लाख तरुणांना प्रशिक्षण मिळणार आहे. यासाठी अर्थसंकल्पात 2 लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करण्यात आले होते.

उत्पादन क्षेत्रात रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी, नियोक्ते आणि कर्मचारी दोघांनाही प्रोत्साहन दिले जाईल. या योजनेचा 30 लाख तरुणांना फायदा होणार असून अतिरिक्त रोजगार निर्माण होण्यास मदत होणार आहे. या योजनेंतर्गत, सरकार EPFO ​​मध्ये योगदानासाठी नियोक्त्यांना दरमहा 3000 रुपये प्रतिपूर्ती पुढील दोन वर्षांसाठी देईल. या योजनेचा लाभ 50 लाख लोकांना होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Khopoli Ghat Traffic : खोपोली घाटात १०० हून अधिक कार थांबल्या, जाणून घ्या धक्कादायक कारण

Mobile Deals: ३००० पेक्षा कमी किंमतीत मोबाईल फोन, YouTube आणि JioHostar पाहण्याची देखील सुविधा

Pune: काय रे तुम्हाला मस्ती आली आहे का? लोखंडी रॉड अन् दगडाने मारहाण; पुण्यात भरचौकात टोळक्यांचा राडा, VIDEO व्हायरल

Maharashtra Live News Update: संगमेश्वर माखजन बाजारपेठेला पुन्हा एकदा पुराचा धोका

Beed News : बांधकाम करताना तोल गेला अन् आक्रीत घडलं, बीडमध्ये २५ वर्षांच्या तरूणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT